शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

सिडको-अंबडला गणरायास भावपूर्ण निरोप

By admin | Published: September 28, 2015 10:49 PM

सिडको-अंबडला गणरायास भावपूर्ण निरोप

सिडको : सिडको, तसेच अंबड परिसरात विघ्नहर्त्या गणरायास भावपूर्ण वातावरणात रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक मंडळांकडून निरोप देण्यात आला.सिडको, अंबड परिसरात गणरायाच्या विसर्जनासाठी सकाळपासून सार्वजनिक मंडळांचे गणेशभक्त तयारीला लागले होते. यंदाच्या वर्षी गणेश मंडळांची संख्या कमी असली तरी उत्साह मोठ्या प्रमाणात दिसत होता. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही महापालिकेच्या वतीने गणेशमूर्ती दान करण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्था केली होती. गणरायाच्या विसर्जनासाठी दुपारी बारा वाजेपर्यंतचा मुहूर्त असल्याने बहुतांशी घरघुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने गणेशमूर्ती दान केले, तसेच काहींनी विसर्जन केले. परंतु दुपारी १२ वाजेनंतरही गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी दिसत होती.ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात भावपूर्ण वातावरणात गणरायाचे विर्सजन करण्यात आले. अंबड येथील श्रीकृष्ण कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कामटवाडे येथील शिवशक्ती सामाजिक विकास संस्था, अंबड औद्योगिक वसाहतीतील डेल्टा मॅगनेट सार्वजनिक उत्सव, रायगड चौक येथील इच्छापूर्ती मित्रमंडळ, अंबड व स्वामीनगर येथील ओम महादेव मित्रमंडळ, कामटवाडे येथील कोकणभवन मित्रमंडळ आदिंनी मिरवणूक काढून गणरायास भावपूर्ण निरोप दिला, तर तुळजा भवानी चौक येथील सिद्धिविनायक मित्रमंडळ, तुळजा भवानी मित्रमंडळ, नवीन नाशिक मित्रमंडळ, राजे संभाजी मित्रमंडळ, गणेश चौक युवक मित्रमंडळ, एकता विविध विकास सेवा संस्था, शिवराज कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ, शिवदुर्गा मित्रमंडळ, राजगड मित्रमंडळ, नटराज मित्रमंडळ यांसह शंभराहून अधिक लहान व मोठ्या मंडळांनी मिरवणूक न काढता आय.टी.आय. पूल, खुटवडनगर येथे गणेशमूर्ती दान, तर काहींनी विसर्जन केले.आय.टी.आय. पूलसह अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, धनराज भोई यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)