शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

तळेगाव प्रकरणी भावनांचा उद्रेक

By admin | Published: October 10, 2016 12:52 AM

संतप्त पडसाद : वाडीवऱ्हेत टायरची जाळपोळ; कठोर कारवाईची मागणी

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव (अंजनेरी) येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटले. ठिकठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर येत आंदोलने केली, तर विल्होळीनजीक बसेसची जाळपोळ करण्यात आली. संतप्त नागरिकांनी तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदने देऊन कठोर कारवाईची मागणी केली.सिन्नर-शिर्डी मार्गावर रास्ता रोकोबेलगाव कुऱ्हे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील घटनेचे पडसाद इगतपुरीच्या पूर्व भागात उमटले. पूर्व भागातील घोटी-सिन्नर- शिर्डी महामार्गावर एकत्र येत आज तीन तास रास्ता रोको आंदोलन करून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. याच मार्गावरील धामणगाव, पिंपळगाव मोर तसेच मुंबई-नाशिक महामार्गावर संतप्त जमावाने घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी महिलांनीदेखील सहभाग घेतला होता. सकाळी सुरू झालेल्या रास्ता रोको निषेधासाठी पूर्व भागातील नांदगाव बुद्रुक, साकुर, पिंपळगाव घाडगा, निनावी, भरवीर, शेणीत आदि भागातील मराठा समाजातील हजारो बांधव उपस्थित होते. दरम्यान, आरोपीच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. साकुर फाट्यावरील दुकाने बंद ठेवून व टायरचे दहन करून कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. शासनाने याबाबत तत्काळ पाऊल उचलत मराठा समाजाच्या पीडित लेकराला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी इगतपुरीचे तहसीलदार अनिल पुरे यांनी सदर ठिकाणी भेट देत जमावाला शांततेचे आवाहन केले.