नाशिक : नवीन समाजरचना घडविण्यासाठी समाजात कार्यरत असताना भावनिकता आणि वैचारिकता यांचा योग्य मिलाफ साधण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे महामंत्री डॉ. वामन गोगटे यांनी केले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील भारतीय शिक्षण मंडळाच्या दोनदिवसीय अधिवेशनाचा रविवारी (दि.१७) सर्वसाधारण सभेने समारोप झाला. तत्पूर्वी संघटनेच्या विस्तारक आणि प्रांत प्रतिनिधींसाठी आयोजित बौद्धिक सत्रात ते बोलत होते. डॉ. वामन गोगटे म्हणाले, भारतीय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून संघटनेमध्ये कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाजाशी भावनिक नाते निर्माण केले पाहिजे तसेच सातत्याने अभ्यास आणि चिंतनाच्या माध्यमातून वैचारिकता निर्माण करण्याचे आवाहनही महामंत्री डॉ. वामन गोगटे यांनी कार्यकर्त्यांना केले. तर दुपारच्या सत्रात नाशिकमधील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी संवाद साधला. त्यांनी संघटनेच्या विविध उपक्र मांची माहिती करून देताना शिक्षणात आवश्यक असलेल्या बदलांविषयी तज्ज्ञांचे विचारही जाणून घेतले. समाजाच्या अभिरु ची सध्या वेगाने बदलत आहेत, त्यामुळे संस्काराची जोपासना करणे हे आव्हानात्मक कार्य ठरले आहे. शिक्षणातून संस्काराची समाजात पाखरण करण्याचे काम भारतीय शिक्षण मंडळ सातत्याने पार पाडत असून, त्यासाठी समर्थ मनुष्यबळ तयार करण्याची गरज असल्याचे यावेळी जोशी म्हणाले. डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी महेश दाबक, डॉ. अस्मिता वैद्य यांच्यासह अधिवेशनास राज्यातून पदाधिकारी व संस्थाचालक उपस्थित होते. पंकज निफाडे यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. विजय अवस्थी यांनी उपस्थितांचे आभार मानले. मंडळाच्या वार्षिक सभेअंतर्गत रविवारी (दि.१७) सकाळी ९.३० वाजता आगामी नियोजनाबद्दलचे मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. त्यात दुपारी १२ ते १ या कालावधीत शिक्षण तज्ज्ञ, विद्यापीठाचे कुलगुरू व मान्यवरांशी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. समारोप समारंभ दुपारी ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विषयावर वक्त्यांनी मार्गदर्शन केले.संघटना बांधणीविषयक मार्गदर्शनअधिवेशनाच्या समारोप सत्रात मुकूल कानिटकर यांनी संघटना बांधणीविषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले. कानिटकर म्हणाले की, संघटनेची बांधणी करताना कार्यकर्त्यांनी समाजाच्या गरजांचा विचार करणे आवश्यक आहे, तर दुपारच्या सत्रात नाशिकमधील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी संवाद साधला. डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले.
समाजाशी भावनिक नात्याची गरज : गोगटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:04 AM