सिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिडको, अंबड भागासह अनेक ठिकाणी मटका, जुगार यासारखे अवैध धंदे जोमाने सुरू आहे. परंतु असे असतानाही याबाबतची माहिती खुद्द पोलीस उपायुक्तांना नाही की त्यांच्याकडूनदेखील याकडे डोळेझाक केली जात, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम सुरू असलेल्या त्रिमूर्ती चौक येथील जुगार अड्डा गुरुवारी पोलिसांनी बंद केल्याचे दिसून आले.अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिडकोतील दत्त चौक, त्रिमूर्ती चौक, खुटवडनगर, साळुंकेनगर, दातीर मळा यांसह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदे जोमाने सुरू आहे. परंतु असे असले तरी याबाबत अंबड पोलीस ठाण्याच्या सुभेदारांनी याठिकाणी कारवाई केली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून कायम वर्दळ असलेल्या त्रिमूर्ती चौक या ठिकाणी जुगार अड्डा सुरू होता.गेल्या काही महिन्यांपूर्वी सदरचा जुगार अड्डा पोलिसांनी बंद केला होता. परंतु यानंतर काही दिवसांनी हा जुगार अड्डा पुन्हां पोलिसांच्या वरदहस्ताने सुरूच होता. परंतु गुरुवारी हा जुगार अड्डा सील केल्याचे समजते. विशेष म्हणजे या जुगार अड्ड्याजवळच काही अंतरावरच संचारबंदीसाठी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी चोवीस तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे . याच ठिकाणी हाकेच्या अंतरावर हा जुगार अड्डा सुरू असताना देखील पोलिसांनी याकडे डोळेझाक केली का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जुगाराबाबत पोलीस उपायुक्त विजय खरात यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी जुगार अड्डा सुरू असेल तर कारवाई करू, असे सांगितले.
सिडको भागात अवैध धंद्यांना जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 1:20 AM
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिडको, अंबड भागासह अनेक ठिकाणी मटका, जुगार यासारखे अवैध धंदे जोमाने सुरू आहे. परंतु असे असतानाही याबाबतची माहिती खुद्द पोलीस उपायुक्तांना नाही की त्यांच्याकडूनदेखील याकडे डोळेझाक केली जात, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम सुरू असलेल्या त्रिमूर्ती चौक येथील जुगार अड्डा गुरुवारी पोलिसांनी बंद केल्याचे दिसून आले.
ठळक मुद्देपोलीस अनभिज्ञ : त्रिमूर्ती चौकातील जुगार अड्ड्यावर अखेर धाड