जळगाव नेऊर : यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाल कांदा लागवडीसाठी क्षेत्र राखीव ठेवले,पण गेले दोन महिन्यापासून उष्ण, दमट वातावरण तर कधी मुसळधार पाऊस यामुळे लाल कांदा रोंपावर बुरशीजन्य रोग पडल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांची कांदा रोपे जमिनीतच सडली.त्यामुळे अनेक शेतकºयांनी जमिनीत रोपच शिल्लक न राहिल्याने नांगर घातला तर काही शेतकºयांनी त्याच जमिनीत पुन्हा बियाणे पेरणी केली.सप्टेंबर आॅक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात लाल कांदा लागवड होत असतात, पण या वर्षी मात्र शेतकºयांना कांदा लागवडीसाठी रोपे तयार होत नसल्याने लाल कांदा लागवडीस उशिर होत असल्याने व खर्च करु नही रोपे नष्ट झाल्याने शेतकºयांनी यावर उपाय शोधत पेरणी यंत्राच्या सहाय्याने कांदा बियाणे पेरणीवर भर दिला आहे.अशा प्रकारे होते कांदा बियाणे पेरणी....ट्रॅक्टरला पेरणी यंत्र जोडून त्यामध्ये कांदा बियाणे दोन किलो टाकुन पेरणी केली .या पेरणी यंत्रामुळे एकरी अवघे २ किलो बियाणे लागते तर यंत्राची एकरी मजुरी २००० रु पये आहे, या पेरणी यंत्राला ११ दाते असून दोन दात्यांमधील अंतर ४ ते ५ इंच असून बियाणे देखील ४ ते ५ इंच अंतरावर व अवघे ४ इंच जमिनीत खोल पडते. या यंत्रामुळे वाफे बांधावे लागत नाही की सरी पाडावी लागत नाही. एकाचवेळी हे यंत्र सारी कामे करते. ते देखील एक एकरासाठी अवघे दोन तासात. या यंत्रामुळे वेळ व खर्चात बचत होते.प्रतिक्रि या...मागील वर्षी दिड एकरावर उन्हाळ कांदा पेरणी केली. त्यासाठी साडेतीन किलो बियाणे लागले. कांदा रोपांचा खर्च, मजुरी, खते यांचा खर्च बघता मागील वर्षी कांदे पेरणीचा प्रयोग करु न बघितला. त्यातुन १८० कांदा उत्पादन निघाले, यावर्षीही कांदा रोपे खराब झाल्याने कांदा बियाणे पेरणी करणार आहे.- वाळुबा कोटकर, कादा उत्पादक शेतकरी.मी आतापर्यंत माझी स्वत:ची एक एकर व दुसºयांची पंचवीस एकर कांदा बियाणे पेरणी केली असून २००० एकर प्रमाणे पेरणीचा भाव चालू आहे. एक एकरासाठी दोन किलो बियाणे लागते. कांदा रोपे नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांची कांदा बियाणे पेरणीसाठी मागणी वाढली आहे.- बाबासाहेब भोरकडे, शेतकरी.
रोपेच नसल्याने कांदा बियाणे पेरणीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 5:28 PM
जळगाव नेऊर : यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाल कांदा लागवडीसाठी क्षेत्र राखीव ठेवले,पण गेले दोन महिन्यापासून उष्ण, दमट वातावरण तर कधी मुसळधार पाऊस यामुळे लाल कांदा रोंपावर बुरशीजन्य रोग पडल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांची कांदा रोपे जमिनीतच सडली.त्यामुळे अनेक शेतकºयांनी जमिनीत रोपच शिल्लक न राहिल्याने नांगर घातला तर काही शेतकºयांनी त्याच जमिनीत पुन्हा बियाणे पेरणी केली.
ठळक मुद्देवेगवेगळे प्रयोग राबवून शेतकऱ्यांचालागवडीचा खटाटोप