शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

यंदाच्या व्हॅलेंटाइन डे ला ‘पर्सनलाज गिफ्ट’ वर जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 2:23 PM

पर्सनलाईज केलेली वस्तू समोरचा व्यक्ती आवडीने जपून ठेवत असून त्याचे मुल्यही वाढते

ठळक मुद्देनिर्मीती सुलभ ५०० हून अधिक पर्याय उपलब्ध   संस्मरणीय ठरत असल्याने साºयांची पसंती

भाग्यश्री मुळेनाशिक- आपल्या प्रिय व्यक्तीला दुकानातुन नुसतीच वस्तू विकत आणून देण्यापेक्षा ती पर्सनलाईज करुन देण्याचा ट्रेंड यंदाच्या व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेमाच्या उत्सवातला सर्वात हिट ट्रेंड असल्याचे समोर आले आहे. अशी पर्सनलाईज केलेली वस्तू समोरचा व्यक्ती आवडीने जपून ठेवत असून त्याचे मुल्यही वाढत असल्याचे बोलले जाते. गेल्या ५ वर्षात हा ट्रेंड हिट असून मैत्री दिन, मदर्स, फादर्स डे आदि महत्वपुर्ण दिवसांबरोबरच व्हॅलेंटाईन डे ला मोठ्या प्रमाणात गिफ्ट पर्सनलाईज करुन देण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या आपल्या प्रिय व्यक्तीला देण्यासाठी खास असे पर्सनलाईज गिफ्ट तयार करुन घेण्याची धावपळ अनेक दुकानांमध्ये, शोरुम मध्ये पहायला मिळत आहे. सोशल मिडीयामुळे, इंटरनेटच्या वेगामुळे आपल्या प्रियजनांचे फोटो सहजगत्या उपलब्ध होत असून अगदी शेवटच्या काही तासांमध्येही कुणी पर्सनलाईज गिफ्ट देण्याचा विचार केला तर त्या गोष्टी सहजसाध्य होत आहे. यात मग, पिलो कव्हर, फोटो फ्रेम, मोबाईल कव्हर, टिशर्ट आदि ५०० हून अधिक वस्तू पर्सनलाईज करुन दिल्या जात आहे. यासाठी १२५ रुपयांपासून १०००० रुपयांपर्यंत खर्च येत असून मुळ वस्तूपेक्षा किंचीतसा जास्तीचा खर्च करुन वस्तूमध्ये आपलेपणा आणता येत असल्याने तरुणाईला हा प्रकार मोठ्या प्रमाणात आवडू लागला आहे. यातही क्रिस्टल, ग्लास, कॉटन, पॉलीस्टर, रबर असे असंख्य उपपर्यायही मिळत असल्याने निवडीला वाव आहे. पर्सनलाईज गिफ्टस वर केवळ प्रियजनांचे फोटोच दरवेळी प्रिंट करुन घेतले जातात असे नाही तर आपल्या प्रियजनांची संबोधने (लाडाची नावे), दोन उशा किंवा उशी कव्हर असतील तर एकावर ‘गुड’, एकावर ‘नाईट’, ‘ही’, ‘शी’ अशी अक्षरे मराठी, इंग्रजीत, वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पहायला मिळत आहे.  किचेन, फोटो फ्रेम, मग, टिशर्ट, पिलो आदि वस्तू पर्सनलाईज करुन गिफ्ट देण्याचे प्रकार आपण आजवर पाहिले आहेत. मात्र आपल्या प्रियजनांचा फोटो मुखपृष्ठावर असलेली वही (नोटबुक), पत्याचा कॅट, लॉकेट, कॅलेंडर, डेली किचन मेनुकार्ड, टेडीबिअरसह असंख्य प्रकारच्या सॉफ्टटॉईज, अल्फाबेटिकली चॉकलेट, पर्स, हॅँडबॅग्ज, स्वेटर, बरमुडा, ज्वेलरी बॉक्स, अ‍ॅप्रन, क्रिस्टल हर्ट, गॅलरी रॅप, माऊस पॅड,कॅँल स्टॅँड, टिफीन,सॉक्स पेअर्स, ग्ला सेट, नेलकटर, बॉलपेन, बेडशीट, पांघरुण, फॅमिली ट्री, क्लचर, साबण, परफ्युम, कोल्डक्रिम, हॅँडक्रिम अशा असंख्य वस्तू ्रआपल्या प्रियजनांची आवड लक्षात घेऊन तयार करुन मिळत आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला कसली अ‍ॅलर्जी आहे वा काय आवडत नाही तो प्रकार टाळला जातो.

टॅग्स :Valentine Day 2018व्हॅलेंटाईन डेValentine Weekव्हॅलेंटाईन वीक