सिन्नर-घोटी महामार्ग हा रहदारीचा रस्ता आहे. अवजड वाहनांची वर्दळ या रस्त्यावरून होत असते. चौफूलीच्या ठिकाणी पावसाच्या पाण्याने डांबरी रस्ता उखडला असून रस्त्यात खड्डे तयार झाले आहेत. वाहनांच्या वर्दळीने मोटारसायकलस्वारांना या खड्ड्यांजवळून कसरत करीतच रस्ता पार करावा लागतो. अंधारात गाड्यांचा प्रकाश डोळ्यावर आल्यावर खड्डे लक्षात येत नसल्याने अनेक मोटारसायकलस्वार या ठिकाणी घसरून जखमी झाले आहेत. अनेकांच्या पाठीच्या दूखापतीलाही हे खड्डे कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खड्डे तातडीने बुजविण्याची कार्यवाही करावी अशी मागणी वाहनधारकांसह प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
सिन्नर-घोटी महामार्गावर डुबेरे नाक्याजवळ खड्ड्यांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 5:40 PM