मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यापासून वेतन रखडले आहे. वेतन तातडीने अदा करावे या मागणीसाठी शनिवारी कर्मचाºयांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक किशोर डांगे यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.सामान्य रुग्णालयात ५२ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. मात्र त्यांचे गेल्या सहा महिन्यांपासून वेतन रखडले आहे. शासनाने कंत्राटदार संस्थेलाच वेतन अदा केले नसल्यामुळे कर्मचाºयांचे हाल होत आहेत. शासनाने तातडीने कंत्राटदार संस्थेला वेतन अदा करावे या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे रुग्णालयातील कामकाज काही काळ बंद ठेवण्यात आले होते. डॉ. डांगे यांच्या मध्यस्थी नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात सतीश पगार, महेश शिंदे, विजय जगताप, नितीन खरे, शरद घोरपडे, शरद पाथरे, युवराज शिंदे आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.
थकीत वेतन प्रश्नी मालेगावला कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 6:49 PM