सातपूर : महानगरपालिकेच्या शाळेत नोकरी करणाऱ्या शिक्षकांची मुलेदेखील मनपाच्या शाळेतच असावीत, अशी अपेक्षा व्यक्त करीत शिक्षकांनी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. सातपूर कॉलनीतील महानगरपालिका शाळा क्र मांक २८ ला आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भेट देऊन शालेय कामकाजाची माहिती घेतली. शाळेमधील ई-लर्निंग प्रोजेक्टर, संगणक सुविधा, शालेय गणेवश, शालेय परिपाठ, शालेय गुणवत्ता उपक्रम, पोषण आहार आदींची माहिती घेतली. शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण यशाबद्दल त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले. शिक्षकांनीदेखील आपल्या मुलांना महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करीत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना केली.आयुक्त गमे यांच्या समवेत उपायुक्त महेश बच्छाव, अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय घुगे, नलावडे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक छाया गोसावी, सुरेश खांडबहाले, सचिन चिखले, योगेश सूर्यवंशी, वैभव आहिरे, सोनजी गवळी, रंगजी वसावे, भारती पवार, सोनिया बोरसे, सोनाली कुवर, अनिल चव्हाण, पुनाजी मुठे, सुरेश चौरे, यशवंत जाधव, मंदाकिनी कटारे, दत्तात्रय शिंपी, पल्लवी शेवाळे, शारदा सोनवणे आदी शिक्षक उपस्थित होते होते.‘स्मार्ट’ विद्यार्थी दुर्लक्षितया शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत सातत्याने उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत असतानाही या विद्यार्थ्यांचे मनपाकडून साधे कौतुकही केले जात नाही. तशी तरतूद शिक्षण मंडळानेदेखील केलेली नाही.
कर्मचाऱ्यांची मुले मनपा शाळेतच असावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:27 AM