इगतपुरी : घोटी टोल नाक्यावरील ८० कर्मचाऱ्यांना वेतन वाढ न मिळाल्याने त्यांनी बुधवारी सकाळ पासून संप पुकारला आहे. यामुळे महामार्गावरील सर्व आपत्कालीन सुविधा बंद झाल्या असून जो पर्यंत वेतन वाढ मिळत नाही तोपर्यंत संप सुरु राहणार आहे .याविषयी कर्मचाऱ्यातर्फे इगतपुरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.एम.एन.ई.एल. या कंपनीने टोल नाक्यावरील कंत्राट टी.एम. एस. आणि एफ. के. या दोन ठेकेदारांना दिले आहे. कंपनी कराराच्य नियमानुसार दर वर्षी एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांची वेतन वाढ होत असते. मात्र एप्रिल महिन्या पासून व्यस्थापनास विनंती करूनही एफ के या ठेकेदाराकडिल जवळपास ८० कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळाली नाही. मात्र टोल प्रशासनाने टी. एम.एस.च्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांची एप्रिल महिन्यातच पगार वाढ करु ण कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव केला असल्याचा आरोप संपकरी कामगारांनी केला आहे. दरम्यान टोल प्रशासनाचे व्यवस्थापाक याविषयी नेहमी उडवा उडविची उत्तरे देत असल्याने संपावर जावे लागले असून , चालू वर्षाची पगार वाढ आणि एप्रिल २०१५ ते सप्टेम्बर २०१५ या ७ महिन्यातील पगाराचा फरक जो पर्यंत मिळत नाही तोपर्यंत संप सुरु राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. संपामुळे मुंबई आग्रा महमार्गावरील गोंदे ते वडपे या १०० की मी अंतरातील पेट्रोलिंग, रुग्णवाहिका ,अग्निशमन आदी सुविधा बंद झाल्या आहेत.(वार्ताहर)
घोटी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांचा संप
By admin | Published: October 01, 2015 12:18 AM