नाशिक : ‘कंत्राटी कर्मचाºयांना समान काम, समान वेतन मिळावे’ या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन करणाºया आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कर्मचाºयांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. आरोग्य विज्ञान विद्यापीठात गेल्या पाच ते दहा वर्षांपासून काम करणाºया कंत्राटी कर्मचाºयांना अत्यल्प मानधन देऊन उच्चस्तरीय दर्जाचे काम करून घेतले जात आहे. यातील बरेचसे कर्मचारी पदवी व पदव्युत्तर पदवी आहेत. विद्यापीठाकडून होणाºया अन्यायाच्या विरोधात ५ डिसेंबरपासून कर्मचाºयांनी विद्यापीठाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले असून, त्यालाही ९० दिवस उलटले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान कामाला समान वेतन मिळावे, अशी मागणी कर्मचाºयांनी केली आहे, तरीदेखील सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला असून, त्यांनी २७ फेब्रुवारी रोजी मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिले परंतु अशी बैठक झाली नाही. सरकारच्या या नाकर्तेपणामुळे कर्मचाºयांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. शासनाने कर्मचाºयांच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात शिवाजी भावले, प्राजक्ता वनील, अश्विन पांड, विशाल मोरे, मनोज राजधर, अण्णासाहेब तिडके आदी सहभागी झाले होते.
तीन महिन्यांपासून आंदोलन करणाºया आरोग्य विद्यापीठातील कर्मचाºयांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 12:07 AM
नाशिक : ‘कंत्राटी कर्मचाºयांना समान काम, समान वेतन मिळावे’ या मागणीसाठी आरोग्य विद्यापीठातील कर्मचाºयांनी धरणे आंदोलन केले.
ठळक मुद्देदहा वर्षांपासून काम करणाºया कर्मचाºयांना अत्यल्प मानधन विद्यापीठाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू