सायखेडा/दिंडोरी/मालेगाव : महिलांना मानाचे स्थान देण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या जाहीर सभांमध्ये केले.महायुतीने राज्यात काम केले असून, जनता त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे विरोधकांचा धुव्वा उडणार आहे, असा विश्वास व्यक्त करून ठाकरे यांनी महायुतीने दिलेले प्रत्येक वचन पूर्ण केल्याचे सांगितले. महायुतीचे सरकार महाराष्टÑामध्ये पुन्हा एकदा सत्तेवर येणार असून, निफाड तालुक्यात खऱ्या अर्थाने अनिल कदम यांनी विकासाचे मॉडेल उभारलेले असल्याने मंत्रिमंडळाच्या माध्यमातून तालुक्याला त्यांच्या रूपाने मानाचे स्थान मिळणार असल्याची ग्वाही-देखील ठाकरे यांनी सायखेडा येथील सभेत बोलताना दिली. यावेळी व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील, जि. प. अध्यक्ष शीतल सांगळे, खासदार भारती पवार आदी उपस्थित होते. (पान ४ वर)यावेळी बाळासाहेब क्षीरसागर ,दीपक शिरसाट, सुधीर कराड, अनिल कुंदे,शिवनाथ कडभाने, उत्तम गडाख, कमल राजोळे, भास्कर बनकर, उदय सांगळे, जगन कुटे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, मालेगाव तालुक्यातील वडेल येथे बोलताना प्रत्येक जिल्ह्यात महिला बचत गट भवन उभारण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम सुरू करणार असून विद्यार्थ्यांचे हाल थांबविण्यासाठी गाव ते शाळा-महाविद्यालयापर्यंत बस सेवा सुरू केली जाईल व डिजीटल शिक्षण मुंबईसह इतर शहरी भागापुरते मर्यादीत न ठेवता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही डिजीटल शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाईल असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, उमेदवार दादा भुसे, सुनील गायकवाड, बंडूकाका बच्छाव, सुनील देवरे आदी उपस्थित होते.दिंडोरी येथे बोलताना नवा महाराष्ट्र उभारणीसाठी आपण निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी उमेदवार भास्कर गावित, रामदास चारोस्कर, धनराज महाले, जिल्हाप्रमुख सुनील पाटील आदी उपस्थित होते.नांदूरमधमेश्वरला नवीन धरण बांधणारसावरगाव परिसरात पंचतारांकित वसाहत उभारण्यासोबतच भविष्यात नांदूरमधमेश्वर धरणावर नवीन धरण बांधण्याचा आपला मानस असल्याचे सायखेडा येथील सभेत आमदार अनिल कदम यांनी सांगितले. निफाड तालुक्यात विविध विकासाचे शिल्प आपण उभे केले असून, रस्त्यांचे जाळे विणले आहे. द्राक्षबागा वाचविण्यासाठी सातत्याने पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा केल्याने मतदार यंदाही आपल्यालाच संधी देतील, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.
बचतगटांच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगारनिर्मिती: आदित्य ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 11:23 PM
महिलांना मानाचे स्थान देण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या जाहीर सभांमध्ये केले.
ठळक मुद्देसायखेडा, दिंडोरी व वडेल येथे जाहीर सभा