मुंडे इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या सुतगिरणीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, बंडूनाना भाबड, दीपक बर्के, भाजपाॉचे नगर जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, सरपंच गोपाळ शेळके, विनायकराव शेळके, आनंदराव शेळके, तहसीलदार राहुल कोताडे, कंपनीचे मालक केशवराव मुंडे, बाळासाहेब आव्हाड, वैभव आव्हाड आदी उपस्थित होते.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यक्षेत्र जरी सीमित असले तरी त्या बाहेर जाऊन गावाकडच्या तरुणांना अर्थसहाय्य करून त्यांना उभारी देण्याचे धाडस मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून केले जात असल्याचे दरेकर म्हणाले. ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांनी व्यवसाय व रोजगाराच्या संधी शोधल्या पाहिजे, असेही ते म्हणाले.
मुंडे इंडस्ट्रीजला परिसरात कच्चा माल नसतानादेखील केशव मुंडे यांनी इतक्या मोठ्या कंपनीची स्थापना करुन नवी संधी निर्माण केली असल्याने तरुणांनी त्यांचा आदर्श घेऊन व्यवसायात उतरण्याचे आवाहन आमदार कोकाटे यांनी केले. आनंदराव शेळके, बाळासाहेब वाघ, विनायक शेळके, बंडू भाबड आदींची भाषणे झाली. यावेळी परिसरातील शेतकरी, नागरिक व युवक उपस्थित होते. शशीकांत येरेकर यांनी सूत्रसंचालन केले.
इन्फो...
इंडस्ट्रीजमध्ये कामे करून रोजगार मिळवा
दरेकर आणि मी जुने मित्र असून, आमच्या मैत्रीत पक्ष येत नाही. पहिली मैत्री आणि नंतर पक्ष. तेव्हा परिसरातील तरुणांनी या इंडस्ट्रीजमध्ये काम करून रोजगार मिळवावा. केशवराव मुंडे यांच्यासारख्या माणसाने ग्रामीण भागात सुरू केलेली ही इंडस्ट्री काही दिवसांमध्ये निश्चितच प्रगतिपथावर जाईल. रोजगारात भर टाकेल, असे आमदार कोकाटे यांनी सांगितले.
===Photopath===
150221\15nsk_12_15022021_13.jpg
===Caption===
नांदूरशिंगोटे येथील मुंडे इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या सुतगिरणीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर. समवेत आमदार माणिकराव कोकाटे, पुरुषोत्तम दळवी, केशवराव मुंडे, बाळासाहेब वाघ, बंडूनाना भाबड, अरुण मुंडे आदी.