येवला : तालुक्यातील अंगुलगाव येथे मत्स्यशेतीतील मत्स्य उत्पादन काढण्याचा शुभारंभ पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड यांच्या हस्ते झाला. मत्स्य उत्पादनाच्या माध्यमातून स्थानिक आदिवासींना रोजगार मिळाला आहे.अंगुलगाव परिसरात चांगल्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने दोन मिहन्यापूर्वी हैदराबाद येथून मच्छ बीज आणून येथील अहिल्यादेवी होळकर, जिजामाता व रमाबाई पाझर तलावांमध्ये सोडण्यात आले होते. आता, या तलावांमध्ये मत्स्यपीक आल्याने मत्स्य उत्पादन काढण्याचा शुभारंभ सभापती गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. सन 2012 पासून गायकवाड यांनी पूर्व भागातील आदिवासी बांधवांचे रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांत रोखण्यासाठी मत्स्य शेतीचा उपक्र म राबविला होता. या उपक्र मातून पूर्व भागातील सुमारे साडेतीनशे कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तर आदीवासी कुटुंबांचे पोटा पाण्यासाठी होणारे स्थलांतरही थांबले आहे. तालुक्यातील पूर्व भागातील जवळपास पंधरा ते सोळा पाझर तलाव मध्ये स्थानिक आदिवासी मत्स्यशेती करत आहे. याप्रसंगी रमेश सोनवणे, शिवाजी गायकवाड, गणेश सोनवणे, कैलास काळे, अनिल पवार, रामदास लांडगे, दादा लोखंडे आदी उपस्थित होते.
अंगुलगावी मत्स्य उत्पादनाने आदिवासींना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 10:10 PM
येवला : तालुक्यातील अंगुलगाव येथे मत्स्यशेतीतील मत्स्य उत्पादन काढण्याचा शुभारंभ पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड यांच्या हस्ते झाला. मत्स्य उत्पादनाच्या माध्यमातून स्थानिक आदिवासींना रोजगार मिळाला आहे.
ठळक मुद्देसुमारे साडेतीनशे कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला