दिशा प्रतिष्ठानपरिचय महिला संस्थांचास्त्रीशिकली, प्रगती झाली’ या उक्तीप्रमाणे एक सुशिक्षित स्त्री आपले घरच नाही तर समाजालासुद्धा सुशिक्षित, सुसंस्कृत बनवते. याचा प्रत्यय आपल्याला ‘दिशा प्रतिष्ठान’च्या कामकाजाकडे बघितल्यावर आल्याशिवाय रहात नाही. आपले दैनंदिन काम, नोकरी व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाºया आदींमधून वेळ काढून काहीतरी वेगळे करावे, अशा अंतरिक तळमळीतून शिल्पा पारख यांच्या पुढाकाराने व संकल्पनेतून दिशा प्रतिष्ठानचा जन्म झाला. जानेवारी २०१६ पासून समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी विविध स्तरावर सुधारणा घडवून आणण्याचे काम दिशाने हाती घेतले. शहरातील समविचारी, समव्यावसायिक महिला एकत्र येऊन या संस्थेच्या छताखाली काम करत आहेत. महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती व त्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी त्या त्या शाळांमधील शिक्षकांच्या सहकार्याने एक कार्यक्रम ठरविण्यात आला. या विद्यार्थ्यांची उपस्थिती, त्यांचा अभ्यास, त्यांचे आरोग्य आदींवर संस्थेच्या सदस्यांनी वैयक्तिकरीत्या लक्ष देऊन पाहणी करून अहवाल बनविला. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी विशेष प्रयत्न करणाºया शिक्षकांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांना वाढत्या वयातील बदल, चांगले-वाईट स्पर्श आदींविषयी मार्गदर्शन केले. याशिवाय या विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठीही व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या विद्यार्थ्यांचे कलागुण वाढविण्यास मदत करणाºया २४ मुख्याध्यापक, आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. महिला सक्षमीकरणासाठीही ‘दिशा’ने वेळोवेळी विविध उपक्रम राबविले. ‘दिशा’च्या छताखाली आज शिल्पा पारख यांच्याबरोबर संगीता बेदमुथा, आरती नहार, दर्शना सराफ, समता सुराणा, दर्शना आंबेकर, सोनम टाटिया आदी सख्या कार्यरत असून, भविष्यात निरनिराळे समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा त्यांना मानस आहे.
महिला व मुलांच्या सक्षमीकरणासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:22 AM