शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

रिकाम्या धावल्या बसेस तरीही पायपीट

By admin | Published: September 26, 2015 12:09 AM

रिकाम्या धावल्या बसेस तरीही पायपीट

नाशिक : प्रवाशांची पायपीट सुरू असतानाही नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे अनेक बसगाड्या रिकाम्या धावत असल्याने प्रवासी भाविकांनी संताप व्यक्त केला. हा उरफाटा प्रकार घडण्यास पुन्हा महामंडळ आणि पोलीस यंत्रणेतील असमन्वय कारणीभूत ठरला. पर्वणीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी बारा वाजता कुशार्वत तीर्थ भाविकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार १२ वाजेच्या आत भाविकांना त्र्यंबकमध्ये आणूच नये असे पोलिसांचे म्हणणे होते. तथापि, गुरुवारी दुपारनंतर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची संख्या वाढली. हे भाविक बसगाड्यांनी नाशिककडे गेल्याशिवाय त्र्यंबकेश्वरात नवीन भाविकांसाठी जागा उपलब्ध होणे शक्य नव्हते. त्यामुळे अगोदरच्या भाविकांना घेऊन जाण्यासाठी बस पाठवा असे पोलिसांनी महामंडळाला सांगितले; मात्र नवीन भाविकांना पाठवण्यासही मनाई केल्याने नाशिकहून त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या बसमधील प्रवाशांना खंबाळे येथे उतरवून रिकाम्या बसगाड्या त्र्यंबकला पाठविण्यात आल्या. परंतु भाविकांची पायपीट होत असताना एसटी बसगाड्या भरून जात होत्या आणि त्या थांबतही नसल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला. तथापि पोलिसांच्या आदेशामुळेच हा प्रकार घडल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अर्थात, काही बसगाड्या पूर्ण क्षमतेने भरून आणि बसच्या छतावर बसून प्रवासी जात असल्याने पायपीट करणाऱ्यांनी त्याबाबत संताप व्यक्त केला; मात्र या गाड्या नाशिकरोड येथून आल्याअसून प्रवाशांनी भरलेल्या बसगाड्या या सिंहस्थ बस स्थानकाजवळच सोडल्या जात असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले; मात्र भाविकांची गर्दी नको म्हणून त्यांना अर्धवट मार्गावर सोडून देणारे महामंडळ प्रत्यक्षात मात्र नाशिकरोड येथील भाविकांना त्र्यंबकेश्वर येथे घेऊन जात असल्याने प्रवाशांना कृतीचे कोडे उलगडलेच नाही.