देवळा : तालुक्यासह शहरात राहणाऱ्या नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याच्या झळा शहरातील नागरिकांना बसत असून महिला वर्ग त्रस्त झाला आहे. यामुळे पुर्वी धोंडया धोंडया पाणी दे म्हणत वरूणराजाला साकडे घालण्याची ग्रामीण भागातील प्रथा शहरात सुरू झाली असून शहरातील उपनगरात राहणाºया नोकरदार महिलांनी एकत्र येत शहरात फिरत वरूणराजाला साकडे घातले.शहरातील कळवण रस्त्यावरील समर्थनगर, सप्तश्रृंगी नगर आदी उपनगरातील महिलांनी गत तीन दिवसांपासून धोंडया धोंडया पाणी दे, साळमाळ पिकू दे असे म्हणत वरूण राजाला साकडे घालण्याचा उपक्र म सुरू केला आहे. यावेळी धोंडया झालेल्या ज्येष्ठ महिलेला पानाफुलांनी सजवून तिची मिरवणुक काढण्यात आली. घरोघरी महिलांनी पूजन केले. यावेळी नागरिक देत असलेल्या दानातून वृक्षारोपण करण्याचा या महिलांचा मानस आहे.पर्यावरणाप्रती जनमानसात सर्वत्र जागरूकता होत असल्याचे आशादायक चित्र दिसू लागले आहे.---------------------पाणीपुरवठा योजना ठप्पदेवळा शहरासाठी गिरणा नदीपात्रातून सामुदायिक पाणीपुरवठा योजना सुरू आहे. हया पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असलेल्या देवळा, सरस्वतीवाडी, माळवाडी, फुले माळवाडी, विजयनगर, खुंटेवाडी, श्रीरामपूर, खालप या गावांना पाणीपुरवठा केला जातो. गिरणा नदीला पाणी असेल तरच योजना सुरू असते. परंतु सद्या चणकापूर धरण अद्याप कोरडेच असल्यामुळे गिरणा नदी कोरडीच आहे. यामुळे पाणीपुरवठा योजना ठप्प आहे.
देवळा येथे महिलांचे वरूणराजाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:45 PM