नाशिकरोड : रोकडोबावाडी, देवळालीगाव येथील चार गोठेधारकांचे नळ व ड्रेनेज लाइन यांचे कनेक्शन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने तोडले. गेल्याच आठवड्यात सिन्नरफाटा येथे, अशी कारवाई करण्यात आली होती.सुरेश बिडवे, सिद्धाप्पा औशिकर, मानकू औशिकर आणि संपत पवार यांचे गोठ्याचे पत्र्याचे शेड आज हटविण्यात आले. ही कारवाई महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त रोहिदास बहिरम, उपअभियंता नीलेश साळी, एम. डी. पगारे, पशुवैद्यकीय अधिकारी पी. एम. सोनवणे, नगरनियोजन विभागाचे अभियंता गरु ड यांनी केली.अतिक्रमण विभागाची सहा पथके व दैनंदिन अतिक्र मण निर्मूलन पोलीस यांनी कारवाईत भाग घेतला. पूर्वपरवानगी न घेता रहिवासी क्षेत्रांमध्ये अनधिकृतपणे गोठे उभारणाऱ्या व्यावसायिकांना महापालिकेने नोटिसा बजावून तातडीने गोठे शहराच्या हद्दीबाहेर स्थलांतरित करण्याबाबत कळविले आहे. ज्यांनी अद्यापि गोठे स्थलांतरित केलेले नाहीत, त्यांनी तातडीने ते स्थलांतरित करावेत अन्यथा कोणत्याही क्षणीगोठे हटविण्याची कारवाई केली जाईल, असे महापालिकेने कळविले आहे.संबंधितांचे वीज, ड्रेनेज व पाण्याचे कनेक्शन बंद केले जाईलच. परंतु, गोठे हटविण्यासाठी येणारा खर्च वसूल केला जाईल तसेच पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात येतील, असे महापालिकेने कळविले आहे.
देवळालीगाव येथील गोठ्यांचे अतिक्र मण हटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:02 AM