शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अतिक्रमण उपआयुक्तांची चौकशी

By admin | Published: June 24, 2017 12:42 AM

नाशिक : महापालिकेचे अतिक्रमण उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप ठेवत स्थायी समितीने अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेचे अतिक्रमण उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्यासह विविध कर विभागाचे सहायक अधीक्षक सुरेश अहेर यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप ठेवत स्थायी समितीने अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. सदर समितीने तीन महिन्यांच्या आत चौकशी अहवाल स्थायी समितीला सादर करावा, असे आदेश सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिले. दरम्यान, सदस्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली होती परंतु, स्थायीच्या अधिकारानुसार सभापतींनी चौकशी समिती नियुक्त केली. स्थायी समितीच्या सभेत मुशीर सय्यद, सूर्यकांत लवटे, वत्सला खैरे, जगदीश पाटील, डी. जी. सूर्यवंशी, अलका अहिरे, मुकेश शहाणे, प्रवीण तिदमे, सीमा ताजणे, भागवत आरोटे, विशाल संगमनेरे, सुनीता पिंगळे व श्याम बडोदे यांनी सभापतींना पत्र देऊन अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम आणि विविध कर विभागाचे सहायक अधीक्षक सुरेश अहेर यांच्या गैरकारभाराची चौकशी करत निलंबनाची मागणी केली.  यावेळी मुकेश शहाणे यांनी अनधिकृत फलकांविरुद्ध इतकी वर्षे का कारवाई झाली नाही? त्यामुळे मनपाचा महसूल बुडाल्याची तक्रार करत दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित केल्याशिवाय सभागृह सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. श्याम बडोदे यांनी वडाळागावातील अनधिकृत गुदामे हटविण्यासंबंधी तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याचे सांगितले. भागवत आरोटे यांनी भंगार बाजार वाढण्यामागे याच अधिकाऱ्यांचा हात असल्याचे सांगत पुन्हा एकदा भंगार बाजार बसत असल्याचे निदर्शनास आणून दिले. प्रवीण तिदमे यांनी ठरावीक भागातच अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई होत असल्याबद्दल शंका उपस्थित  केली.  जगदीश पाटील यांनी गाळ्यांच्या भाडेमूल्यात तफावत असल्याचे स्पष्ट करत चौकशी समिती नियुक्त करण्याची सूचना केली. सूर्यकांत लवटे यांनीही बेकायदेशीर होर्डिंग्जवर कारवाई होत नसल्याची तक्रार केली. मुशीर सय्यद यांनी घरकुल योजनेच्या लाभार्थींमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत महापालिकेत दलालांची साखळीच कार्यरत असल्याचा आरोप केला. डी. जी. सूर्यवंशी, सीमा ताजणे, शशिकांत जाधव यांनीही अतिक्रमण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कारवाईची मागणी केली. शेवटी सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी स्थायीला असलेल्या अधिकारानुसार अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. या समितीत मुख्य लेखापरीक्षक महेश बच्छाव, स्थायी समितीचे सदस्य शशिकांत जाधव, सूर्यकांत लवटे, मुशीर सय्यद, जगदीश पाटील, मुकेश शहाणे व डी. जी. सूर्यवंशी यांचा समावेश करण्यात आला. सदर समितीने नि:पक्षपातीपणे चौकशी करत तीन महिन्यांच्या आत  चौकशी अहवाल स्थायीला सादर करण्याचे आदेशही सभापती गांगुर्डे यांनी दिले.बहिरम यांचे स्पष्टीकरणसभापतींनी उपआयुक्त रोहिदास बहिरम यांना झालेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्याची सूचना केली. त्यानुसार बहिरम यांनी सांगितले, शहरात केलेल्या सर्व्हेनुसार १५८ अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आले असून, नोटिसा दिल्यानंतर आता कारवाई सुरू करण्यात आली आहे. ज्यांनी नियमित करण्यासाठी अर्ज केले नाहीत त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली जात आहे. हॉकर्स झोनबाबतही सहाही विभागांत प्रत्येकी दोन झोन कार्यान्वित करण्याच्या सूचना विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. खासगी जागेतील अतिक्रमणही काढण्याची कार्यवाही चालू आहे. मोकाट जनावरे पकडण्याबाबतही ठेका देण्यात आल्याची माहिती बहिरम यांनी दिली.