येवला : पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम शुक्रवारीदेखील (दि. १८) सकाळी ६ वाजता सुरू झाली. येवला-विंचूर चौफुलीपासून मोहिमेला सुरुवात झाली. मनमाड रस्त्यात बाजार समितीपर्यंत असलेले फलक जेसीबीच्या साहाय्याने उतरविण्यात आले. विंचूर चौफुली ते मनमाड रोड मार्केटपर्यंतच्या शेड सुमारे दीड तासात काढल्या. या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली. त्यानंतर ९ वाजता जनता विद्यालयासमोरील ममता स्वीटपासून मोहिमेला सुरु वात झाली. १९८८ साली बांधलेल्या आंबेडकर शॉपिंग सेंटरमधील ५० गाळ्यांचे अतिक्रमित शेड आणि ओटे पाडण्यात आले. या मोहिमेत १०० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेमुळे आंबेडकर शॉपिंग सर्व्हिस रोड खुला होण्यास मदत होणार आहे. शुक्र वारी सकाळ सत्रातील मोहीम ११ वाजता आटोपली. त्यानंतर ठिकठिकाणी पडलेला मलबा हटविण्याचे काम चालू झाले. या व्यापारी गाळ्यांचे शेड, ओटे काढून घेण्यात आले. दि. १९ मे पर्यंत मोहीम चालणार असल्याचे मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी सांगितले.
अतिक्रमण : शुक्रवारच्या मोहिमेत टपऱ्याही उद्ध्वस्त व्यापारी गाळ्यांचे अतिक्रमित ओटे काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:38 AM