नाशिकरोड : जेलरोड पंचक येथील मनपा कर्मचारी वसाहत व जगताप मळा येथील गजानन सोसायटीत सामासिक अंतरात केलेले अनधिकृत बांधकाम गुरुवारी मनपा अतिक्रमणविरोधी पथकाने पाडून टाकले.जेलरोड पंचक शिवरोड येथील मनपा कर्मचाऱ्यांची वसाहत असलेल्या इमारतीत तळमजल्यावर सामाजिक अंतरात शिवाजी इंगळे, ज्ञानेश्वर कातारे, कौशल्या लिंगायत, नाना गायकवाड, हिरामण राव यांनी पक्के अनधिकृत बांधकाम केले होते. मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साह्याने गुरुवारी सकाळी सामासिक अंतरातील बांधकाम पाडून टाकले. तसेच बिटको महाविद्यालयामागील जगताप मळा येथील गजानन हौसिंग सोसायटीत सामासिक अंतरातील चंद्रभान पुंड यांचे दुकान व रवि लोहारकर यांची गॅलरी अतिक्रमण पथकाने जमीनदोस्त करून टाकले.
जेलरोडला अतिक्रमण हटविले
By admin | Published: December 12, 2015 12:13 AM