ठळक मुद्देअनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम
सातपूर : शहरातील अनधिकृत आणि अतिक्रमित बांधकामे हटविण्याची मोहीम सुरूच असून, गुरुवारी सातपूर परिसरातील गंगापूर गावातील वाढीव बांधकामे, अतिक्रमित शेड महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात हटविण्याची कारवाई केली आहे.महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर गावात धडक मोहीम राबविण्यात आली. गावातील रस्त्याच्या सामासिक अंतरात उभारण्यात आलेले अनधिकृत वाढीव बांधकामे (ओटे) हटविण्यात आलेत. त्यानंतर अतिक्रमित पत्र्यांचे शेडदेखील काढून घेण्यात आलेत. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, शहरातील सिडको, इंदिरानगर, पंचवटी भागांतदेखील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.