सातपूर : सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी मंडईबाहेरील रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या अनधिकृत भाजीविक्रेत्यांना पोलीस बंदोबस्तात हटविण्याची कारवाई सायंकाळी महापालिकेच्या वतीने करण्यात आली. या मोहिमेत तीन ट्रक साहित्य व भाजीपाला जप्त करण्यात आला.वारंवार सांगूनही आणि वेळोवेळी कारवाई करूनही उपयोग होत नसल्याने बुधवारी सायंकाळी विभागीय अधिकारी लक्ष्मण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत मंडईबाहेर व्यवसाय करणाºया व्यावसायिकांचा भाजीपाला जप्त करण्यात आला. यावेळी व्यावसायिकांची पळापळ झाली होती. महापालिकेच्या तीन वाहनांमध्ये हा माल जप्त करण्यात आला. या विक्रेत्यांवर यापूर्वीही अनेक वेळा कारवाई करण्यात आली आहे. वारंवार सूचित करूनही हे व्यावसायिक ऐकत नसल्याने बुधवारी पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी काही विक्रेत्यांनी तीव्र विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस बंदोबस्तामुळे हा विरोध फार काळ टिकू शकला नाही. या मोहिमेत मनपाचे २५ कर्मचारी सहभागी झाले होते.निवेदनाची दखलमंडईबाहेर अनधिकृत व्यवसाय करणाºया व्यावसायिकांना मंडईत स्थलांतरित करावे आणि रस्ता पूर्णपणे रहदारीसाठी खुला करावा, अशी ग्रामस्थांची जुनी मागणी आहे. तर मंडईतील समस्या सोडविण्याची श्री छत्रपती शिवाजी मंडई असोसिएशनच्या वतीने मंगळवारी विभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली होती. या निवेदनाची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली.इंदिरानगर : वडाळागावातील घरकुल योजनेलगत असलेल्या अनधिकृत दोन झोपड्या व पदपथावरील अनधिकृत दोन पत्र्यांचीे घरे अखेर महापालिकेच्या पूर्व विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने भुईसपाट केली.वडाळागावातील १०० फुटी रस्त्यावरील मांगीर बाबा चौक ते पांढरी चौक रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सुमारे शंभर झोपड्यांमुळे रस्तारुंदीकरण व डांबरीकरणास अडथळा निर्माण झाला होता. अखेर दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या अतिक्र मण विभागाने पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन झोपड्या भुईसपाट करण्यात आल्या होत्या. तातडीने रस्त्याचेरुंदीकरण व डांबरीकरण करून वाहतुकीचा रस्ता मोकळा करण्यात आला होता. परंतु अतिक्रमण विभागाची पाठ फिरताच घरकुल योजना लगत असलेल्या मोकळ्या जागेत सुमारे १२ ते १५ अनधिकृत झोपड्या वसविल्या होत्या. त्यामुळे पुन्हा अनधिकृत झोपडपट्टीचे स्वरूप आले होते. त्यामुळे ही मोहीम राबविण्यात आली. सदर मोहीम विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवंत वाघ, सचिन सणस, मुनीर शेख, ४० कर्मचारी आणि एक वाहनाचा ताफा यांनी राबवली.महापालिकेच्या पूर्व विभागाकडून कारवाईवडाळागाव परिसरात वाढत्या अतिक्रमणाची दखल घेत सुमारे वीस दिवसांपूर्वी महापालिका पूर्व विभागाच्या अतिक्र मण दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घरकुल योजनेलगत असलेल्या दहा अनधिकृत झोपड्या जेसीबीच्या सहाय्याने भुईसपाट करण्यात आल्या होत्या. परंतु त्यावेळी दोन झोपडीधारकांनी विरोध करून आम्हाला मुदत द्यावी, असे म्हणून वेळ मारून नेली होती. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने घरकुल योजनेलगत असलेल्या दोन अनधिकृत झोपड्या व पदपथावरील दोन पत्राचे शेड भुईसपाट केले.
सातपूर येथील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 11:46 PM