शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

मनपाच्या भूखंडावरही गोठ्याचे अतिक्रमण

By admin | Published: May 31, 2016 10:56 PM

नगरसेवकाचा प्रताप : प्रशासनाकडून कारवाईबाबत कायदेशीर चाचपणी

नाशिक : राष्ट्रवादीतून नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक विनायक तथा नय्या खैरे यांनी म्हसरूळ-मखमलाबाद लिंकरोडलगत १८ मीटर डीपी रस्त्यावर जनावरांच्या गोठ्याचे अनधिकृत बांधकाम उभारण्याचा भीमपराक्रम तर केलाच शिवाय त्यासोबत सर्व्हे नंबर १९/२ ब या मंजूर अभिन्यासातील महापालिकेच्या मालकीचा १४९७ चौ.मी. मोकळ्या भूखंडावरही गोठ्याचे बांधकाम केल्याचे समोर आले आहे. महापालिकेने सदर अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्यानंतर खैरे यांनी स्वत:हून बांधकाम हटविण्यास प्रारंभ केला आहे. दरम्यान, खैरे यांच्यावर अपात्रतेसंबंधीच्या कारवाईबाबत मनपा प्रशासनाने कायदेशीर चाचपणी सुरू केली आहे. महापालिका आयुक्तांनी शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना अनधिकृत बांधकामप्रकरणी अपात्रतेची नोटीस बजावल्यानंतर लोकप्रतिनिधींचे धाबे दणाणले असतानाच राष्ट्रवादीतून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले नगरसेवक विनायक खैरे यांनाही सोमवारी (दि.३०) अनधिकृतपणे गोठ्याच्या बांधकामाबद्दल दणका दिला. खैरे यांनी म्हसरूळ-मखमलाबाद लिंकरोडच्या समांतर १८ मीटर डीपी रस्त्यावर अनधिकृतपणे म्हशीचा गोठा थाटला होता. त्याबाबत महापालिकेने अतिक्रमण काढून घेण्याबाबत सूचना केल्यानंतर खैरे यांनी आपले राजकीय वजन वापरण्याचा प्रयत्न करून पाहिला; परंतु तो फसल्यानंतर त्यांनी सोमवारी स्वत:हूनच अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली होती. महापालिका प्रशासनाकडून केवळ १८ मीटर डीपीरोडवरच अतिक्रमण झाल्याचे सांगण्यात येत होते आणि रस्ता मोकळा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, खैरे यांनी १८ मीटर डीपी रस्त्यावरच नव्हे तर मखमलाबाद येथील सर्व्हे नंबर १९/२ ब या मंजूर अभिन्यासातील मनपाच्या मालकीचा १४९७ चौ.मी. मोकळा भूखंडही बळकावत तेथे अनधिकृतपणे म्हशीचा गोठा थाटला असल्याचे निदर्शनास आले आहे. सदरचा मोकळा भूखंड हा केशव पिंगळे या जागामालकाकडून महापालिकेकडे ९ फेबु्रवारी २००७ मध्ये हस्तांतरित झालेला आहे. त्याबाबत कब्जा पावती करारनामाही नगररचनाच्या सहायक संचालकाने महापालिकेच्या लाभात नोंदून घेतलेला आहे.