सावरकर चौक ते पेठे नगर कॉर्नर जुना रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यालगत सप्तशृंगी सोसायटी, गुरुकृपा सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, महारुद्र कॉलनी, आयटीया सोसायटी, जाखडीनगरसह विविध अपार्टमेंट व सोसायट्या आहेत. त्यामुळे आणि परिसरातील नागरिकांना शहरात ये-जा करण्यासाठी सावरकर चौक ते पेठे नगर कॉर्नर या रस्त्याचा वापर करतात. परिसरातील नागरीकरण वाढत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी अरुंद पडत असल्याने वाहतुकीस अडचण निर्माण होत असे. रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार सुमारे वीस वर्षांनंतर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी १८ मीटर रस्त्याचे मोजमाप नगररचना विभागाकडून करण्यात येऊन सावरकर चौक ते पेठे नगर कॉर्नर रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या आठ मिळकत धारकांनी अतिक्रमण केल्यामुळे त्यांना मार्किंग करून नोटिसा देण्यात आल्या होत्या. हे अतिक्रमण येथे दहा दिवसात स्वतःहून काढून घ्यावे, अन्यथा अतिक्रमण विभागाच्यावतीने कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यापैकी काही मिळकत धारकांनी स्वयंस्फूर्तीने मार्किंग केलेले अतिक्रमण काढून घेतले. परंतु अद्याप काही मिळकत धारकांनी अतिक्रमण काढले नसल्याने त्यांच्यावर अतिक्रमण विभाग कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
(फोटो १२ मार्किंग)