नाशिकरोड : मोटवानीरोड लोकमान्यनगर येथील श्रीकृपा बंगल्यात राहणाऱ्या भाडेकरूंनी सामासिक अंतरामध्ये केलेले कच्चे-पक्के अतिक्रमण मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने जमीनदोस्त केले.मोटवानीरोड लोकमान्यनगर येथील श्रीकृपा बंगल्यामध्ये काही भाडेकरू भाडेतत्त्वावर राहतात. त्यांनी बंगल्याच्या सामासिक अंतरामध्ये अनधिकृतपणे कच्चे-पक्के खोल्यांचे, शौचालय, स्नानगृह, पत्र्याचे दुकान, पत्र्याचे शेड आदी प्रकारचे अतिक्रमण केले होते. याबाबत मनपा प्रशासनाकडे आॅनलाइन तक्रार करण्यात आली होती. मनपा अतिक्रमण विरोधी पथकाकडून बाळासाहेब भवर, संजय बोराडे, मधुकर बोरसे, सुषमा गोडसे, चंद्रकांत गवंडर, संतोष गवंडर यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी काही जणांनी आपले अतिक्रमण काढून घेतले होते.यावेळी जेलरोड शिवाजीनगर येथे जुने घर असलेल्या संतोष जाधव यांच्या घराजवळील अतिक्रमित ओटा हटविण्यात आला. तर अतिक्रमित शौचालय काढून घेण्यास आठ दिवसांची मुदत देण्यात आली.शनिवारी दुपारी मनपा विभागीय अधिकारी महेंद्र पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा अतिक्रमण विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबी, गॅसकटर आदी साहित्याच्या मदतीने बंगल्याच्या सामासिक अंतरामध्ये केलेले कच्चे-पक्के बांधलेले अतिक्रमण, पत्र्याचे शेड, पत्र्याची टपरी आदी सर्व अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले.
अतिक्रमित बांधकाम जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 11:56 PM
मोटवानीरोड लोकमान्यनगर येथील श्रीकृपा बंगल्यात राहणाऱ्या भाडेकरूंनी सामासिक अंतरामध्ये केलेले कच्चे-पक्के अतिक्रमण मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने जमीनदोस्त केले.
ठळक मुद्देनाशिकरोड : लोकमान्यनगर येथील घटना