त्र्यंबकेश्वर : विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्या अंगी असणा्नयिा कलागुणांना वाव देऊन विकसित करावे, असे प्रतिपादन नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. बह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलात आयोजित ब्रह्मोत्सव - २०२० या कला, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित ब्रह्मोत्सव - २०२० चा समारोप नांगरे पाटील व अॅग्रिकल्चर हेड फॉर एशिया अमेरिकन अॅम्बेसी नवी दिल्लीचे डॉ.मुरली बांदला यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी पार पडला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माधव चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण आदी उपस्थित होते. नांगरे पाटील पुढे म्हणाले, बालवयातच ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाचे जीवनात अनुकरण केल्यास आज समाजात घडणाऱ्या वाईट घटना कमी होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. कठोर परिश्रम केल्यास यश नक्कीच मिळते, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या कॉलेज जीवनातील काही गमतीदार प्रसंग सांगून मुलांना खळखळून हसविले. डॉ.मुरली बांदला यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.संस्थेचे सरचिटणीस गौरव पानगव्हाणे, संचालक प्रभावती पानगव्हाणे यांनी स्वागत केले. विनायक निखाडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी विजय वाघ, सुनीता वाघमारे, चंद्रकांत शिरसाठ, वैशाली सोनवणे, रमेश जोशी, मनीषा शिंदे, संचालक विजय तांबे, रजिस्ट्रार समाधान पगार आदींसह पालक उपस्थित होते.तेजा देवकर यांची भेटब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलातील विविध विद्याशाखांतील विद्यार्थ्यांना कला-क्र ीडा, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल नांगरे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मराठी सिनेअभिनेत्री तेजा देवकर यांनी भेट दिली व नृत्यकला सादर करून वाहवा मिळवली. पदान्यासाने त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर केला.
‘ब्रह्मोत्सव’ सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 10:57 PM
विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्या अंगी असणा्नयिा कलागुणांना वाव देऊन विकसित करावे, असे प्रतिपादन नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. बह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलात आयोजित ब्रह्मोत्सव - २०२० या कला, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
ठळक मुद्देअंजनेरी : विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आविष्काराला रसिकांनी दिली दाद