खामखेडा : चालू वर्षी जूलै महिना संपतआला तरी खामखेडा परिसरातील विहिरी अजूनही पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने कोरड्या आहेत.खामखेडा, सावकी, पिळकोस, विसापूर, भादवन, चाचेर आदी गावे बागायती शेतीसाठी ओळखले जातात. या गावातील शेतकरी लाल कांदा, उन्हाळी कांद्याबरोबर टमाटे, कोबी, मिरची आदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घतात. त्यामुळे परराज्यातील बाजारपेठेत नाव घेतले जाते. परंतु या गावाची शेती ही पावसावरच अवलंबून आहे. कारण या गावाच्या परिसरात एकही मोठ्या धरण नाही. तेव्हा डोंगर उतारावर पडणारे पाऊसाचे पाणी नाला-बांध मघ्ये जमा होऊन जमिनीत मुरणाऱ्या पाण्यावर या गावांना वरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. दर वर्षी जून माहिन्यामघ्ये पाऊस पडल्यावर त्या पाऊसावर शेतकरी आपल्या खरीप पिकाची पेरणी करीत असे. त्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या पावसात विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते असे.चालू वर्षी सुरवातीचे तिन्ही नक्षत्र कोरडी गेली.आद्रा नक्षत्राच्या शेवटच्या दोन दिवस जेमतेम पाऊस झाला.या पाऊसावर शेतकर्याने खरीप पिकाच्या पेरण्या केल्या.त्यानंतर पाऊसाने दिंडी मारली.आण िपिके पाण्याअभावी करपू लागली होती.पुन्हा दुबार पेरणीच्या करावी लागते कि काय याची चिंता शेतकºयाला लागली होती. परंतु शुक्र वारी २० तारखेला पुन्हा पाऊसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले होते. परंतु त्यांनतर पुन्हा सोमवारी पासून प्रचंड प्रमाणात ऊन पडू लागले होते. त्या ऊनाची तीव्रता मोठ्या प्रमाणात होतीकी त्यामुळे प्रचंड उखाडा जाणवत होता.त्यामुळे पिके पुन्हा कोमजू लागली होती.परंतु गेल्या तीन दिवसांपासून रिमझिम पावसाला सुरु वात झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.परंतु खामखेडा डोगर परिसरात अजूनही दमदार पाऊस न झाल्यामुळे अजून डोंगर उतारावर पाऊसाचे पाणी वाहिले नसल्याने नाला बांध, केटीवेर अजून कोरडे आहेत. जमिनीत पाणी न मुरल्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत अजून वाढ झालेली नसल्यामुळे अजून विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे खामखेडा शिवारातील विहिरी जुलै मिहना संपत आला तरी अजूनही कोरड्याचं आहेत. दर वर्षी खामखेडा परिसरातील शेतकरी लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतो. लाल कांद्याचे बियाणे जुलै महिन्यात टाकली जातात, कारण जुलै महिन्यात पाऊस पडल्यावर विहिरींना पाणी उतरलेले असते. तेव्हा शेतकरी लाल कांद्याची लागवड आॅगस्ट महिन्यात करतो. तेव्हा नोंहेबर महिन्यात लाल कांदा तयार होऊन मार्केट मघ्ये येतो. परंतु अजूनही विहिरींना पाणी नसल्याने लाल कांद्याची बियाणे घरात पडून आहेत. त्यामुळे अजूनही खामखेडा परिसरात जोरदार पाऊसाची अपेक्षा शेतकरी करीत आहे.
जुलै महिना संपतआला तरी विहिरी अजून कोरड्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 7:58 PM
खामखेडा : चालू वर्षी जूलै महिना संपतआला तरी खामखेडा परिसरातील विहिरी अजूनही पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने कोरड्या आहेत.
ठळक मुद्देखामखेडा : परिसरातील शेती पावसावर अवलंबून असल्याने शेतकरी हवालदिल