नाशिक : पंडित कॉलनीतील एकेरी वाहतूक मार्गावर अखेर तोडगा निघाला असून, नवीन पंडित कॉलनीतून दुहेरी वाहतूक यापुढे सुरू होईल. मात्र जुन्या पंडित कॉलनीतून एकेरी वाहतूक कायम असणार आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या दालनात याबाबत बैठक झाली त्यात हा तोडगा काढण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून नवीन पंडित कॉलनी व जुनी पंडित कॉलनी येथे एकेरी वाहतूक सुरू करण्यात आलेली होती. त्यामुळे दोनही ठिकाणच्या व्यावसायिकांना व रहिवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. लोकमतने याबाबत नागरीकांच्या भावनांची वाट मोकळी करून दिली होती. सदर व्यावसायिकांनी व रहिवाशांनी आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे याबाबत तक्र ार केली होती. त्या अनुषंगाने गुरुवारी (दि.२५) पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. आमदार फरांदे, नगरसेवक अजय बोरस्ते तसेच स्थानिक व्यावसायिक व रहिवाशांचे प्रतिनिधी यांच्या समवेत बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत प्रायोगिक तत्त्वावर नवीन पंडित कॉलनी येथील वाहतूक दुहेरी करण्यात आली असून, सम-विषम वाहनतळ व्यवस्था करण्यात आलेली आहे व सर्व संमतीने व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनेसमोरील ओटे काढून टाकण्यात येऊन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यासही सर्वांनी संमती दिली. जुनी पंडित कॉलनी येथील वाहतूक एकेरीच ठेवण्यात आली. फक्त त्यामध्ये विरु द्ध बाजूने वाहतूक असणार आहे. राजीव गांधी भवन सिग्नल येथून प्रवेश देण्यात येऊन गंगापूररोडला बाहेर निघता येणार आहे. या बैठकीस पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजयकुमार मगर, श्रीमती माधुरी कांगणे, सहा. पोलीस आयुक्त देवरे, पोलीस निरीक्षक श्रीमती देसाई, डॉ. भाऊसाहेब मोरे, डॉ. नारायण देवगावकर, डॉ. रवींद्र शिवदे, डॉ. योगेश गायधनी, डॉ. हितेश चौधरी, डॉ. अभिषेक बागुल, नीलेश जाजू, राहुल डागा, संपत कसरा, आर. बी. ठाकरे, विनायक निकम, संजय आहिरराव, रोहित काळे, गिरीश येवला आदी उपस्थित होते.
नवीन पंडित कॉलनीतून अखेरीस दुहेरी वाहतूक तिढा सुटला : सम-विषम पार्किंग करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:32 AM
नाशिक : पंडित कॉलनीतील एकेरी वाहतूक मार्गावर अखेर तोडगा निघाला असून, नवीन पंडित कॉलनीतून दुहेरी वाहतूक यापुढे सुरू होईल.
ठळक मुद्दे एकेरी वाहतूक सुरू सम-विषम वाहनतळ व्यवस्था