चांदवड - येथील आठवडेबाजारातील रामभक्त हनुमान मंदिरात बुधवार दि. १५ आॅगस्ट ते गुरुवार दि. २३ आॅगस्ट पर्यंत श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन संपन्न झाला यानिमित्त दररोज काकडा भजन सकाळी ८ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ४ ते ६ पावेतो श्रीरामकथा रामायणाचार्य मधुकर महाराज जाधव जोपुळकर यांची झाले तर दररोज सायंकाळी ६ ते ७ सामुदायीक हरीपाठ, रात्री हरीकीर्तन असे कार्यक्रम संपन्न झाले यात समाधान महाराज रिंगणगावकर जळगाव, सुनील महाराज झांबरे बीड, संदीपान महाराज शिंदे हसेगाव , उस्मानाबाद, प्रकाश महाराज साठे बीड, ज्ञानेश्वर महाराज जळकीकर जळगाव, लक्ष्मण महाराज कोकाटे बारामती, विश्वनाथ महाराज कोल्हे चिखलओहोळ, बालकिर्तनकार सोहम महाराज सातपुते बीड यांची कीर्तने झालीत .तर गुरुवार दि. २३ आॅगस्ट रोजी पदमाकर महाराज देशमुख अमरावती यांचे काल्याचे कीर्तनाने व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली या सप्ताह यशस्वी करण्यासाठी समस्त सप्ताह समिती आठवडेबाजार हनुमान मंदिर यांनी परिश्रम घेतले.
चांदवडच्या आठवडेबाजारातील हनुमान मंदिरात अखंड हरीनाम सप्ताहाची समाप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 4:49 PM
चांदवड - येथील आठवडेबाजारातील रामभक्त हनुमान मंदिरात बुधवार दि. १५ आॅगस्ट ते गुरुवार दि. २३ आॅगस्ट पर्यंत श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन संपन्न झाला
ठळक मुद्दे पदमाकर महाराज देशमुख अमरावती यांचे काल्याचे कीर्तनाने व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता