शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

कांदा लागवडीत शेतकरी व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:46 PM

दत्ता महाले । येवला : कांद्याचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा कांद्याचे दर मागील एक ते दोन ...

ठळक मुद्देलगबग : बाजारभाव मिळतो की नाही याची शाश्वती नसल्याने चिंता

दत्ता महाले ।येवला : कांद्याचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा कांद्याचे दर मागील एक ते दोन महिन्यांपासून टिकून असल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड करत असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी महिना संपेपर्यंत कांदा लागवड सुरू राहणार आहे.दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात कांदा रोपे खराब झाली. अवकाळी पावसाने तब्बल तीनदा रोपे वाया गेल्याने सध्या रोपाला सोन्याचा भाव मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कांदा लागवड न करता महागड्या दराने रोपे विकून आर्थिक प्राप्ती करून घेत आहे. तर तालुक्याच्या काही भागात यंदा समाधानकारक पावसामुळे कांदा लागवडीवर भर आहे. एकीकडे घरची रोपे सडून गेली तर दुसरीकडे बाजार समित्यात कांद्याचे भाव गगनाला भिडत असल्याने महागड्या किमतीने का होईना मिळेल तेथून रोपे घेऊन कांदा लागवडीसाठी शेतकरी वर्गाची लगीनघाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महिनाभरापासून येवला तालुक्यातील सर्वच भागात वातावरणात सातत्याने बदल होत आहे.पहाटे पडणाºया दाट धुक्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. वातावरण बदलामुळे कांद्यावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरु वात झाली आहे. दाट धुक्याने नवीन कांदा लागवड धोक्यात आली असून, लागवड केलेल्या कांद्याचे शेंडे पिवळसर पडत असल्याने सातत्याने औषध फवारणी कांद्यावर करावी लागत असल्याने कीटकनाशकांचा खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कांद उत्पादन झाल्यानंतर बाजारात शाश्वत दर मिळेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.मजुरांची वानवा; मजुरीही वाढलीयेवला तालुक्यातील राजापूर, पाटोदा, मानोरी बुद्रुक, चिचोंडी,नेऊरगाव, देशमाने, जळगाव नेऊर, कोटमगाव, अंदरसूल, नगरसूलआदी भागात अद्यापही कांदा लागवडीसाठी मजुरांची वानवा भासतआहे. मजूर वेळेत उपलब्ध होत नसल्याने अनेक ठिकाणी विकत घेतलेली रोपे खराब होत चालली असून, मजुरीचा दरदेखील वाढला आहे. सध्या कांदा लागवडीचा प्रतिएकर भाव हा तब्बल आठ हजार रु पयांपर्यंत पोहचला असून, ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी शेतकरी जादा पैसे देऊन मजूर आपल्या शेतात बोलवत असल्याचेही दिसून येत आहे.औषध फवारणीचा खर्च वाढलाकांदा दर चांगल्या प्रकारे टिकून असल्याने यंदा मजुरांचीदेखील कांदा लागवडीसाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. कांदा लागवडीसाठीचे क्षेत्र दरवर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक शेतकºयांनी पेरणी केलेला हरभरा पीक नांगरून कांदा लागवड केली आहे.ढगाळ वातावरणामुळे औषध फवारणी करण्याचा खर्चदेखील वाढला आहे. सध्या लागवड केलेल्या कांद्याला भाव मिळतो का नाही, याची कोणत्याही प्रकारची शाश्वती नसून कांदा लागवड जगविण्यासाठी मात्र शेतकरी जिवाचे रान करत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा