येवला : इंजिनिअर व आर्किटेक्ट यांचे परवाने तातडीने नुतनीकरण करण्याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांना आदेश देण्याची मागणी दीपक पाटोदकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचेकडे केली आहे.येवला नगरपरिषद हद्दीत विकासकामे करणारे, नकाशे व संबंधीत काम करणार्या इंजिनिअर, आर्किटेक्ट यांनी डिसेंबर महिन्यातच परवाने नुतनीकरणासठी नगरपरिषदेकडे अर्ज केलेले आहेत. राज्य शासनाने एकीकृत विकास नियंत्रर व प्रोत्साहन नियमावलीला ३ डिसेंबर २०२० पासून मंजूरी दिलेली आहे. या अंर्तगत झालेली आज्ञावली संगणीकृत करणे गरजेचे आहे. त्यासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंत ऑफलाईन बांधकाम परवानगी देणे संदर्भात शासन निर्णय झाला आहे. मात्र, येवला नगरपरिषदेत शासन निर्णयानुसार कार्यवाही होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.शहरातील बांधकाम परवाने प्रलंबीत राहण्याचे प्रमाण वाढले असून तांत्रिक सल्लागारांचे परवाने नुतनीकरण न झाल्याने नागरीकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे या प्रश्नी तातडीने इंजिनिअर व आर्किटेक्ट यांचे परवाने नुतनीकरणाबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांना आदेश व्हावेत, अशी विनंती निवेदनाच्या शेवटी पाटोदकर यांनी केली आहे. सदर निवेदनाची प्रत विभागीय आयुक्तांनाही देण्यात आली आहे.
इंजिनिअर, आर्किटेक्ट परवाने नुतनीकरणाचे आदेश देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:49 IST
येवला : इंजिनिअर व आर्किटेक्ट यांचे परवाने तातडीने नुतनीकरण करण्याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांना आदेश देण्याची मागणी दीपक पाटोदकर यांनी ...
इंजिनिअर, आर्किटेक्ट परवाने नुतनीकरणाचे आदेश देण्याची मागणी
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, सदर निवेदनाची प्रत विभागीय आयुक्तांनाही देण्यात आली आहे.