वणी : अंघोळीसाठी ओझरखेड धरणात उतरलेल्या महिंद्र कंपनीतील मोहम्मद मोमीन सरवर (२५) या अभियंत्याचा रविवारी सकाळी बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी वणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
नाशिकच्या महिंद्र अँड महिंद्र कंपनीतील महादेव प्रशांत पंडा (२४), चिरंजीव गौरांग शामल (२५), चंदन चगोली मोहंती (२५), मोहम्मद मोमीन सरवर (२५), अमित जयचंद्र साहू (२४) हे ओडिशा राज्यातील पाच अभियंता मित्र सुटी असल्याने रविवारी सकाळी ओझरखेड धरणालगत आले. ओझरखेड गावामागील रस्त्याकडून मरीआई मंदिर परिसर हा धरणाचा भाग आहे. त्या ठिकाणी त्यांनी अंंघोळ करण्याचे ठरविले. मोमीन बुडाल्यानंतर मित्रांनी मदतीसाठी आवाज दिला. स्थानिक युवक त्या ठिकाणी आले. त्यांनी पाण्यात उतरून मोहम्मदला बाहेर काढले. दरम्यान, १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला माहिती देण्यात आली. मोहम्मदला वणीच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी वणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हात सटकल्याने दुर्घटनामित्रांसमवेत मोहम्मद मोमीन सरवर हा युवक पाण्यात उतरला. त्याला पाण्याचा अंदाज आला नाही व तो पाण्यात बुडू लागला. मित्रांनी मोहम्मदला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र हात सटकल्याने तो पाण्यात बुडाला.