- संकेत शुक्ल नाशिक - आयएसआयएसआय (इसिस) या प्रतिबंधीत दहशतववादी संघटनेतील मृत सदस्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करणाऱ्या पुरविणाऱ्या संशयित युवकाला दहशतवाद विरोधी पथकाने नाशिकमधून अटक केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा युवक अभियंता असून त्याच्या काही कंपन्याही आहेत. हुजेफ अब्दुल अजीज शेख (३०, रा.एमराल्ड रेसिडेन्सि तिडके कॉलनी नाशिक) असे या संशयित युवकाचे नाव आहे. दहशतवादिवरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्याची चौकशी केली असता त्यात तथ्य आढळल्याने मंगळवारी रात्री त्याला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडून ७ मोबाईल, तीन सीमकार्ड, लॅपटॉप, पेनड्राईव्ह यांसह काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याचे ५ राष्ट्रीयकृत बँकेत खाते असून त्यामार्फत त्याने केलेल्या व्यवहारांची तपासणी केली असता प्रतिबंधीत दहशतवादी संघटनेच्या कुटूंबाला आर्थिक मदत करण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या रबिया उर्फ ओसामा या महिलेच्या खात्यावर ही रक्कम जात असल्याचे निष्पण्ण झाले. बॅटल ऑफ बबूझ म्हणजेच दहशतवादी लढाईत मृत पावलेल्या कुटूंबांच्या बदतीसाठी उभारण्यात आलेल्या संघटनेर्च्फत ही मदत त्या कुटूंबांपर्यंत पोहोचवली जात होती. आज त्याला नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ३१ जानेवारी पर्यँत एटीएस कोठडी दिली.