नाशिक : इंजिनिअरिंग व बी.फार्मसी या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी येत्या २ ते १३ मे या कालावधीत एमएचटी सीईटी परीक्षा होणार असून, या परीक्षेचे हॉल तिकीट संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावर्षी तब्बल चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी आॅनलाइन सीईटी परीक्षेसाठी अर्ज केले आहे. यात महाराष्ट्रातील सर्वाधिक मुलांचा समावेश असून, अन्य राज्यांतूनही मुलांनी प्रवेश अर्ज केले आहेत.इंजिनिअरिंग व बी.फार्मसी या पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना महासीईटीच्या संकेतस्तळावर शुक्रवारपासून (दि. २६) सीईटीसाठीचे हॉल तिकीट उलब्ध करून देण्यात आले असून, विद्यार्थ्यांनी त्यांचा लॉगइन आयडी व पासवर्डचा वापर करून हॉल तिकीट डाउनलोड करून घेता येणार आहे. अभियांत्रिकी, औषध-निर्माणशास्त्र या पदवी शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य असून, यावर्षापासून सीईटी परीक्षा प्रथमच आॅनलाइन स्वरूपात घेतली जाणार असून, त्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या चार टप्प्यांमध्ये आॅनलाइन सराव सीईटी परीक्षाही घेण्यात आली आहे. आता २ ते १३ मे दरम्यान आनलाइन सीईटी होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील तसेच राज्याबाहेरील विद्यार्थ्यांनीदेखील अर्ज दाखल केले आहे. तीन लाख ९६ हजार ६२४ अर्ज हे महाराष्ट्रातून आले आहेत, तर १७ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज हे इतर राज्यांतून आले आहेत. नाशिक जिल्ह्यातून २१ हजार २६८ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहे. विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित (पीसीएम), भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र (पीसीएमबी) असे तीन पर्याय उपलब्ध करून दिले होते.
इंजिनिअरिंग, बी.फार्मसी सीईटीचे हॉल तिकीट संकेतस्थळावर उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 6:42 PM
इंजिनिअरिंग व बी.फार्मसी या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी येत्या २ ते १३ मे या कालावधीत एमएचटी सीईटी परीक्षा होणार असून, या परीक्षेचे हॉल तिकीट संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावर्षी तब्बल चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी आॅनलाइन सीईटी परीक्षेसाठी अर्ज केले आहे. यात महाराष्ट्रातील सर्वाधिक मुलांचा समावेश असून, अन्य राज्यांतूनही मुलांनी प्रवेश अर्ज केले आहेत.
ठळक मुद्दे इंजिनिअरिंग, बी.फार्मसीसाठी येत्या २ ते १३ मे दरम्याने सीईटीसीईटीचे हॉल तिकीट शुक्रवारपासून संकेतस्थळावर उपलब्ध