नाशिक : जिल्ह्यात जवळपास २० अभियांत्रिकी पदवी व २५ पदविका महाविद्यालये असून यातील बहुतांश महाविदयालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी एकूण शुल्काच्या काही टक्केच रक्कम देऊन प्रवेश घेतले आहेत. तर शासनाकडून शिष्यवृत्तीच्या स्वरुपात महाविद्यालयांना मिळणारी प्रतिपूर्तीची देयकेही अद्याप मिळाली नसल्याने अभियांत्रिकी महाविद्यलायांचे अर्थचक्र बिघडले आहे.
नाशिक जिल्ह्यात बहुतांश अभियांत्रिकी महाविद्यालये खासगी शिक्षण संस्थांचे विनाअनुदानित अथवा स्वयंअर्थसहाय् आहेत. या महाविद्यालयांचे अर्थचक्र हे विद्यार्थ्यांकडून मिळणारे शुल्क व शिष्यवृत्तीच्या प्रतिपूर्तीवर अवलंबून असते. परंतु , यावर्षी कोरोनामुळे प्रथम वर्ष अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया लांबली आहे. त्याचप्रमाणे प्रवेशित विद्यार्थ्यांनीही संपूर्ण शुल्क भरलेले नाही. त्यामुळे महाविद्यालयांवर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याची अथवा त्यात कपात करण्याची वेळ आली आहे. कपात केलेले वेतन कर्मचाऱ्यांना भविष्यात मिळणार आहे, मात्र, सध्या मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनात ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक साहित्यावर कराव्या लागणाऱ्या खर्चासह वैयक्तिक खर्चाचे गणित जुळवितांना कसरत करावी लागत असून महाविद्यालयांबरोबरच कर्मचाऱ्यांचेही आर्थिक बजेट बिघडले आहे.
पॉईंटर -
महाविद्यालयांची संख्या
शासकीय - खासगी
२० - ००
विद्यार्थी क्षमता -७६०६ विद्यार्थी क्षमता - ७६०६
प्राध्यापकांची संख्या - २१५०
शिक्षकेत्तरांची संख्या - १२७५
इन्फो-
कर्मचाऱ्यांनी जगावे कसे ?
जिल्ह्यातील काही महाविद्यालयांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली असली तरी बहुतांश महाविद्यालयांची शिष्यवृत्तीची देयके अद्याप महाविद्यालयांना मिळालेली नाहीत. त्यामुळे प्राध्यापकांचे व शिक्षकेतरांचे वेतन रखडले आहे. काही महाविद्यालयांनी अंशत: वेतन केले आहेत, मात्र, तुटपुंज्या वेतनात कर्मचाऱ्यांनी जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोट-
कोरोनामुळे अजूनही अभियांत्रिकी महाविद्यालये बंद आहेत. या काळात ऑनलाईन शिक्षण सुरू होते, मात्र, विद्यार्थ्यांचा प्रात्यक्षिक सराव झालेला नाही, शिवाय विद्यार्थीही घरी बसून कंटाळले आहेत. त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी लवकरात लवकर महाविद्यालये सुरू होणे आवश्यक आहे.
- गजानन खराटे, प्राचार्य
(आरफोटो- १६ इंजिनियरिंग कॉलेज)