सटाणा येथील महाविद्यालयात १९९२-९३ या शैक्षणिक वर्षात इंग्रजी विषयात बीए होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र यावे, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. याकामी लतीश उपासनी आणि रोहिणी देवरे यांनी पुढाकार घेतला. सुटीचे औचित्य साधून या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (दि. ७) गंगापूर रोडवरील हॉटेल कॅलिस्टोमध्ये उत्साहात पार पडला.प्रारंभी संजय येवला, किरण देवरे, मयूर येवला, प्रकाश देवरे, नंदू जगताप, लतीश उपासनी, संतोष खैरनार, अविनाश कोठावदे, गिऱ्हे भाऊ, सविता निकम, अर्चना अहिरे, संगीता बच्छाव, संगीता अहिरे, रोहिणी देवरे, शैलजा पाटील या सर्व माजी विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात प्रत्येकाने स्वत:चा परिचय करून देत महाविद्यालयाच्या आठवणीत हरवून गेले. या वेळी प्रा. बी.जे. शेवाळे, प्रा. एस.जी. खैरनार, प्रा. भाबड सर यांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीमुळेच आपण घडलो, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. संजय येवला, मयूर येवला आणि किरण देवरे यांनी पुढच्या वर्षी स्नेहसंमेलन सटाणा येथे करण्याचे जाहीर केले. स्नेहभोजनानंतर एकमेकांचा निरोप घेत मेळाव्याची सांगता झाली. प्रास्ताविक उपासनी यांनी तर सूत्रसंचालन देवरे यांनी केले. येवला यांनी आभार मानले.
२८ वर्षांनंतर एकत्र आले इंग्रजीचे पदवीधर विद्यार्थी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 5:55 PM
सटाणा : येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पदवीधरपर्यंतचे शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसायानिमित्त एकमेकांपासून दुरावलेले विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने २८ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले, परस्परांची चौकशी केली आणि आठवणींमध्ये हरवून गेले...
ठळक मुद्दे सटाणा महाविद्यालय : आठवणींना उजाळा