नाशिक : येथील एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र व वसाहत परिसराच्या सुरक्षेचा विचार करता, वीज केंद्र वसाहतीत असामाजिक तत्त्वाकडून उपद्रव व दहशत निर्माण करण्याची शक्यता गृहीत धरून वीज केंद्र व कर्मचारी वसाहतीची सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी कडक पाऊल उचलले असून, त्यासाठी त्यांनी रहिवासी व व्यावसायिकांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. त्यात प्रामुख्याने वसाहतीत राहणाऱ्या कर्मचा-यांनी आपला रहिवासी गाळा भाड्याने देऊ नये. दिला असल्यास तत्काळ रिकामा करून घ्यावा, वसाहतीत येणारे फेरीवाले, अनोळखी इसम, एस.टी. बसेस व इतर वाहनांची तपासणी टीआरडी गेट नं. १ व नवीन डी गेट नं. २ येथे करण्यात येईल. या दोन्ही गेटमधून प्रवेश करणा-या सर्व वाहनधारकांची रीतसर नोंद केली जाईल. वसाहतीतील रहिवाशांकडे घरकामासाठी येणारे कामगार, दूधवाले, पेपरवाले यांना गेटपास देण्यात येणार असून, गेटपासशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. वसाहत परिसरातील सर्व दुकाने रात्री ९ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात यावे तसेच वसाहत परिसरात रात्री कट्ट्यावर बसणा-या मुलांना पालकांनी समज द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. वसाहत परिसरात येणारे कोणतेही सामान किंवा घरगुती सामान याची नोंद नवीन डी गेट नं. २ येथे केली जाईल. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने नवीन डी कॉलनी परिसरातील बिल्डिंग नं. १० जवळून रेल्वे ट्रँकमार्गे पीस पार्ककडे जाणारे दोन्ही रस्ते बंद करण्यात येणार असून, तेथील कर्मचा-यांनी दंडा गेटचा वापर करावा, अशा सूचनाही निखारे यांनी दिल्या आहेत.
नाशिक एकलहरे वीज केंद्राची सुरक्षा वाढविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 3:43 PM
सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी कडक पाऊल उचलले असून, त्यासाठी त्यांनी रहिवासी व व्यावसायिकांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. त्यात प्रामुख्याने वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाºयांनी आपला रहिवासी गाळा भाड्याने देऊ नये. दिला असल्यास तत्काळ रिकामा करून
ठळक मुद्देवाहनांची तपासणी : अनोळखींना प्रवेश बंद गेटपासशिवाय कोणालाही प्रवेश नाही