मनमाड : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य घेतलेल्या एसटी महामंडळाचा ७१वा वर्धापनदिन मनमाड बस आगारात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, शहरप्रमुख मयूर बोरसे, गटनेते गणेश धात्रक, संतोष बळीद, आगार व्यवस्थापक प्रीतम लाडवंजारी आदी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचे बस आगाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. आगार व्यवस्थापक प्रीतम लाडवंजारी यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचा हेतूविशद केला. १ जून १९४८ रोजी सुरुवात झालेल्या एसटीने शहरासह ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनात महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.७१व्या वर्धापन दिनानिमित्त मनमाड बसस्थानकावरून बाहेरगावी जाणाऱ्या व येणाºया प्रवाशांना महामंडळाकडून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या सेवेबरोबरच पर्यावरणाच्या रक्षणासाठी हातभार लावावा, असे आवाहन सुहास कांदे यांनी केले.बस डेपोमध्ये एसटी महामंडळाच्या लोगोची आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी नगरसेवक विलास कटारे, महेंद्र गरुड, विजय शेळके, शिलावट, घुगे, सोनवणे आदी उपस्थित होते.
एसटीचा ७१वा वर्धापनदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 9:27 PM
मनमाड : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य घेतलेल्या एसटी महामंडळाचा ७१वा वर्धापनदिन मनमाड बस आगारात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, शहरप्रमुख मयूर बोरसे, गटनेते गणेश धात्रक, संतोष बळीद, आगार व्यवस्थापक प्रीतम लाडवंजारी आदी उपस्थित होते.
ठळक मुद्देमनमाड : प्रवाशांचा केला सत्कार