नाशिक शहरात वाहनतळांची संख्या मुळातच कमी आहे. महापालिकेने पाच ते सहा वाहनतळासाठी आरक्षित भूखंड जागा मालकाकडून विकसित करून घेतले मात्र त्यावर टोलेजंग व्यापारी संकुले उभी राहिली परंतु वाहनतळाचा वापर होत नाही. नाशिक महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बीओटीवर स्मार्ट पार्किंग प्रकल्प राबविण्याची तयारी केली आहे. मात्र, सध्या हे काम वादात आहे. मुळात त्यासाठी महापालिकेने स्वतंत्र वाहनतळ न करता रस्त्याच्या कडेच्या २८ जागा निवडल्या आहेत. तर पाच ठिकाणी मैदाने आहेत. मात्र हा प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही. दुसरीकडे शहरातील व्यापारी संकुलांनी पुरेशी जागा साेडलेली नाही आणि वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने रस्त्यालगत कुठेही वाहने उभी केली जातात.
नाशिकचे पोलीस आयुक्तालय तसेच नाशिक महापालिकेने वाहने टोईंग करून नेण्याचे तसेच दुचाकी उचलून नेऊन दंड करण्याचे प्रकार केले आहेत. मात्र ते रोगापेक्षा इलाज भयंकर अशा स्वरूपातील असून त्यामुळे सध्या बंद आहेत. वाहतूक पोलीस जेमतेम कारवाई करीत आहे. परंतु त्यामुळेही समस्या आहेत.
इन्फेा..
शहराची लोकसंख्या
२०,०००००
---
९ लाख १२ हजार
दुचाकी संख्या
------
७२०००
---इन्फो..
तर वाहन मालकांवर कारवाई
रस्त्यावर वाहन उभे केल्यास कलम १२२ अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना आहेत. त्यानुसार ते कार्यवाही करतात. मात्र नवीन पोलीस आयुक्तांनी वाहतुकीला शिस्त लावू परंतु जे अधिकार कायद्याने पोलिसांना दिले आहेत. त्याचाच वापर करू असे म्हटले आहे.
वाहतूक पोलिसांची वाहने मेनरोडसारख्या भागात फिरत नाही ते कॉलेजरोड सारख्या भागात फिरतात. तेथेही केवळ ध्वनिक्षेपकावरून समज दिली जाते. त्यामुळे काहीच उपयोग होत नाही.
इन्फो..
मेनरोड सर्वाधिक त्रासदायक
शहरातील सर्वच उपनगरातील बाजारपेठांच्या परिसरात रस्त्यावर दुचाकी आणि मोटारी उभ्या केल्या जातात परंतु सर्वाधिक त्रास शहराच्या मध्यवर्ती असलेल्या बाजारपेठेत म्हणजे मेनरोड परिसरात आहेत. मध्यवर्ती बाजारपेठेत शिवाजी रोड, मेनरोड, सराफ बाजार याठिकाणी वाहनांमुळे तासन्तास वाहतूक कोंडी होते. शहरातील वाहनतळे ताब्यात घेतलेली नाही बऱ्याच जागांवर राजकीय नेत्यांचा कब्जा असल्याने ही समस्या उद्भवली आहे.
इन्फो..