चांदवड : दारू पिऊन ३१ डिसेंबर साजरा करण्यापेक्षा व्यसनमुक्त व्हा, त्याने सतत जीवन प्रगतीच्या मार्गावर राहील. ३१ डिसेंबर व्यसनाधीन होऊन साजरा करण्यापेक्षा व्यसनमुक्तीसाठी विविध उपक्रम करा, असा सल्ला ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी येथे दिला. चांदवड तालुका व जिल्ह्यातील वारकरी यांच्या सहकार्याने व ह.भ.प. दत्तात्रय राऊत यांच्या पुढाकाराने व्यसनमुक्तीपर जनजागृती कीर्तनसेवा, महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर निरूपण करताना बंडातात्या म्हणाले की, संतांच्या सहवासात राहून जीवन चांगले होऊ शकते जसे की परिसाच्या सान्निध्यात जसा विळा आला की तो सोने होऊन जातो, सेंद नावाचे एक फळ कच्चे असले की ते खूप कडू लागते आणि पिकले की अत्यंत गोड, म्हणून आपण चांगल्याच व्यक्तीच्या संगतीत राहा व आपले जीवन बदलून टाका, व्यसनमुक्त व्हा! अशा अनेक प्रकारच्या उदाहरणांचे दाखले देऊन सर्व भाविकांना एक आदर्शवादी महापुरुषाची संगत धरून व्यसनमुक्तीबद्दल अत्यंत चांगले विचार मांडले. देशाच्या प्रगतीत बाधा येऊ शकते म्हणून व्यसन करू नका, इतरांनाही करू देऊ नका, व्यसनाचे दुष्परिणाम, व्यसनामुळे आरोग्याचा धोका यासारखे अमूल्य विचार त्यांनी यावेळी आपल्या कीर्तनात जाहीर स्पष्ट केले.परमार्थ हा आपल्या जीवनात आत्मसात करा म्हणजे जीवनाचे कल्याण होईल. या कार्यक्रमास वैराग्यमूर्ती ह.भ.प. तुकाराम जेऊरकर, तुकाराम निकम, माधव शिंदे, शिवाजी वाघ, नीलेश निकम, पांडुरंग पाटील, शिवनेई, चंद्रकांत आहेर, प्रवीण वाघ, समाधान पगार, बळीराम बाबा शिंदे, एकनाथ भांडे, बाळू संचेती तसेच चांदवड तालुक्यातून शेकडो युवक, महिला, पुरुष कीर्तनासाठी उपस्थित होते. यावेळी जगन्नाथ राऊत, विजय राऊत, महेंद्र कुलकर्णी, संजय आव्हाड, प्रभाकर बोटवे, नवनाथ गांगुर्डे, संत गजानन महाराज भक्त मंडळ चांदवड यांनी विशेष परिश्रम घेतले.
व्यसनमुक्त राहिल्यास जीवन समृद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 10:54 PM
दारू पिऊन ३१ डिसेंबर साजरा करण्यापेक्षा व्यसनमुक्त व्हा, त्याने सतत जीवन प्रगतीच्या मार्गावर राहील. ३१ डिसेंबर व्यसनाधीन होऊन साजरा करण्यापेक्षा व्यसनमुक्तीसाठी विविध उपक्रम करा, असा सल्ला ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी येथे दिला. चांदवड तालुका व जिल्ह्यातील वारकरी यांच्या सहकार्याने व ह.भ.प. दत्तात्रय राऊत यांच्या पुढाकाराने व्यसनमुक्तीपर जनजागृती कीर्तनसेवा, महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
ठळक मुद्देबंडातात्या कराडकर : चांदवडला जनजागृती कीर्तनसेवा