पिंपळगाव बसवंत : सजविलेल्या बैलगाडीतून संभळच्या तालात वाजत-गाजत पिंपळगाव बाजार समितीत दाखल झालेल्या सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या उन्हाळ कांद्याला पहिल्याच दिवशी सर्वाधिक उच्चांकी ४२०० रुपये भाव क्विंटलप्रमाणे बाजारभाव मिळाला.
निफाड तालुक्यातील सुकेणे येथील कांदा उत्पादक शेतकरी शामराव सीताराम मोगल यांनी आपल्या शेतात कुठल्याच केमिकल औषधांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करून उन्हाळ कांदा पिकविला. विषमुक्त कांदा असल्याने थेट बैलगाडीची सजावट करून समवेत संभळ वाजंत्री पथक घेऊन कांदा पिंपळगाव बाजार समितीत विक्रीस दाखल केला. बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर व मान्यवरांच्या उपस्थित सुकेणे येथील कांदा उत्पादक शेतकरी शामराव सीताराम मोगल यांचा सेंद्रिय पद्धतीने कांदा पिकविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यानंतर बाजार समितीच्या कार्यालयाजवळ लिलाव प्रक्रिया पार पडली. शामराव मोगल यांच्या सेंद्रिय कांद्याला ४२०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे चालू वर्षातील उच्चांकी दर मिळाला.
----------------------
आजच्या युगात हायब्रीडचा मोठा बाजार निर्माण झाला. त्यामुळे विषमुक्त भाजीपाला व फळे मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे नाना प्रकारच्या आजारानेदेखील थैमान घातले आहे. अशात जर आपण सेंद्रिय पिकांकडे लक्ष दिले तर ते आरोग्यासाठी गुणकारी असल्याने त्यास बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने त्याकडे लक्षदेखील देणे गरजेचे आहे.
-शामराव सीताराम मोगल, कांदा उत्पादक, शेतकरी (०३ पिंपळगाव १)
030721\03nsk_16_03072021_13.jpg
०३ पिंपळगाव १