नाशिक : नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात नेहमीच नव्या नवलाईने होते. मुलांच्या चेहऱ्यावरील ही नवलाई टिपण्यासाठी पालकांकडून मुलांसाठी वाट्टेल ते म्हणत शालेय साहित्य खरेदी करण्याला अग्रकम दिला जातो. पालकांची हीच दुखरी नस ओळखत विक्र ेत्यांकडून बच्चे कंपनीला आकर्षित करण्यासाठी शालेय साहित्यातील विविध पर्याय खुले करून दिले आहेत. यंदाही बाजारपेठेवर चिनी वस्तूंचे अतिक्र मण झाल्याचे दिसत आहे. सध्या शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत विद्यार्थी व पालकांची एकच झुंबड उडाली आहे.नवीन शैक्षणिक वर्ष म्हटले की एकीकडे प्रवेशप्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे शालेय साहित्य खरेदीचे सोपस्कार पालकांकडून पार पाडले जातात. नव्या वह्या, पुस्तकांसह दप्तर, कंपास, डबे, पाण्याची बाटली यासह अन्य काही गरजेच्या वस्तंूची सातत्याने नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आवर्जून खरेदी केली जाते. शाळा सुरू होण्यास दोन दिवस राहिल्याने बाजारपेठ विद्यार्थी व पालकांच्या गर्दीने फुलली आहे. गत काही वर्षांपासून शैक्षणिक संस्थांनी शालेय साहित्याची खरेदी ही शालेय आवारातून करण्याची सक्ती केल्याने ग्राहकांसह पालकांचाही हिरमोड झाला आहे; मात्र आजही वह्या, पुस्तके काही वेळा शालेय बूट आदी साहित्य सोडल्यास अन्य खरेदी ही बाहेरून होते.बहुपयोगी कंपासची मागणीकंपासमध्ये डबल, सिंगल यासह शार्पनर, रबर, वेळापत्रक ठेवण्याची सोय आणि अन्य काही सुविधा असलेल्या कंपास ५० रु पयांपासून दोनशे रु पयांपर्यंत उपलब्ध आहेत. कार्टूनचे मुखवटे व लायटिंग असलेल्या पेन्सिलींना बच्चे कंपनीची विशेष पसंती आहे. ३० ते ४० रु पये प्रती नगापासून त्यातील वैशिष्ठ्यानुसार याची विक्र ी होत आहे. अनेक शाळांनी स्टीलचे डबे अनिवार्य केले असले तरी पालकांकडून सर्रासपणे आकर्षक प्लॅस्टिक डब्यांची खरेदी होत आहे. त्यातही कार्टूनची छाप असून, काही आरोग्यप्रेमी पालकांकडून हवा बंद, शिजवलेले अन्नपदार्थ गरम राहतील, अशा काही डब्यांची खरेदी केली जात आहे.सामाजिक संघटनांकडून मोफत वह्या वाटपसामाजिक संघटनांकडून शाळांमध्ये मोफत वह्या उपलब्ध करून देण्यात येत असून, काही राजकीय पक्ष ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर वह्या उपलब्ध करून देत असले तरी अनेक पालक अजूनही दुकानातूनच वह्या, पुस्तके खरेदीला प्राधान्य देतात. परंतु, शालेय वह्यांच्या मोफत वाटपामुळे काही प्रमाणात मागणी घटल्याचे दुकानदार सांगतात. सध्या बाजारपेठेत २०० पानी वह्या २५०-३०० रु पये डझन, १०० पानी १२० ते १५० रु पये डझन, रजिस्टर १५ ते २० रु पयांपासून वह्यांच्या दर्जानुसार कमी अधिक किमतीमध्ये उपलब्ध आहेत.
शालेय साहित्य खरेदीला उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:55 AM