शहरं
Join us  
Trending Stories
1
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
2
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
3
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
4
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
5
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
6
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
7
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
8
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
9
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
10
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
11
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
12
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
13
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
14
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
15
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
16
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
17
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
18
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
19
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
20
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

भरपावसातही भाविकांचा दांडगा उत्साह

By admin | Published: September 19, 2015 12:01 AM

भरपावसातही भाविकांचा दांडगा उत्साह

नाशिक : तिसऱ्या आणि अखेरच्या पर्वणीला रात्री ३ वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली आणि त्यानंतर संततधार धरूनही भरपावसात भाविकांचा गोदास्नानासाठी दांडगा उत्साह दिसून आला. शाही मिरवणुकीत रथारूढ महंतांनीही रामकुंडात शाहीस्नानापूर्वी पर्जन्यस्नानाची अनुभूती घेतली. तिसऱ्या शाही पर्वणीला रात्री १ वाजेपर्यंत गोदाघाट परिसरात फारशी वर्दळ नव्हती. मात्र, त्यानंतर साधुग्राममधून काही धार्मिक संस्थांच्या प्रमुखांसोबत असंख्य भाविकांचे जथ्थे गोदाघाट परिसराकडे स्नानासाठी मार्गक्रमण करताना दिसून आले. मात्र, पहाटे ३ वाजेच्या सुमारास पावसाचे विजांच्या कडकडाटासह जोरदार आगमन झाले आणि अनेकांची तारांबळ उडाली. परंतु, स्नानासाठी जाणाऱ्या आणि स्नान करून येणाऱ्या भाविकांचा उत्साह दांडगा होता. भरपावसात हजारो भाविकांनी गोदास्नान केले. पंचवटी अमरधामकडील नवीन शाहीमार्ग तर भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला होता. पावसाचा जोर वाढल्याने अनेकांनी पंचवटी अमरधामचा आश्रय घेतला तर अनेकांनी टाळकुटेश्वर पुलाजवळ अग्रवाल सभेने उभारलेल्या मंडपात धाव घेतली. त्यानंतर साधुग्राममधून निघालेल्या शाही मिरवणुकीत सहभागी झालेल्या साधू-महंतांनाही पावसात भिजतच रामघाटाकडे मार्गस्थ व्हावे लागले. आखाडे व खालशांनी आपल्या श्रीमहंतांसाठी वाहनांवर सिंहासनाची सजावट करून ठेवली होती. परंतु नियोजित वेळेत मिरवणूक रामकुंडावर जाणे आवश्यक असल्याने आखाड्यांना भरपावसातच मिरवणूक काढावी लागली. त्यामुळे रथारूढ महंतांना शाहीस्नानापूर्वीच पर्जन्यस्नानाचा अनुभव घ्यावा लागला. काही महंतांनी स्वत:च छत्री हाती धरत तर काहींनी रेनकोट परिधान करत पावसापासून आपला बचाव केला. अनेकांनी वाहनात बसणेच पसंत केले. रथावर आरूढ झालेले काही साधू तर भरपावसात चिलीम ओढताना दिसून आले. (प्रतिनिधी)