शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

रामभूमी नाशकात भक्तांचा उत्साह शिगेला; घराघरांवर फडकले भगवे ध्वज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 12:54 PM

भगवान श्रीराम यांनी आपला वनवास काळ नाशिकच्या पंचवटी दंडकारण्यात व्यतित केल्याचे दाखले इतिहासात व पुराणात आढळतात.

ठळक मुद्दे शौनकाश्रम येथे २१फुटी गुढी उभारण्यात आली ‘उंच उभारू माणुसकीची गुढी राम असलेली घडेल पुन्हा एक पिढी’

नाशिक : अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडत असताना श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या रामभूमी नाशकातही भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अनेक घरांवर भगवे ध्वज फडकत असून अंगणामध्ये रांगोळ्या रेखाटल्या गेल्या आहेत. राम मंदिरांमधून ‘जय श्रीराम’चे घोष ऐकू येत असून घंटानाद व शंखध्वनी सुरू आहेत, अवघे जन रामरंगी रंगले आहे. तपोवन, पंचवटी, रामकुंड, काळाराम मंदीर परिसरात भक्तीमय वातावरण पहावयास मिळत आहे.

भगवान श्रीराम यांनी आपला वनवास काळ नाशिकच्या पंचवटी दंडकारण्यात व्यतित केल्याचे दाखले इतिहासात व पुराणात आढळतात. नाशिकमध्ये जागोजागी त्याच्या खुणाही आढळतात, म्हणूनच अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे भूमिपूजन होत असताना नाशिकच्या गल्लोगल्ली श्रीरामाचा जयघोष होत आहे. पंचवटी व तपोवनातील मंदिरांवर रोषणाई केली गेली असून प्रभू राम यांचे स्नान स्थान म्हणून प्रख्यात असलेल्या रामकुंडावर घंटानाद सुरू झाला आहे. नाशिक पूरोहित संघ, विश्व हिंदू परिषद यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी रामकुंडावर जमा झाले असून तेथे आरती व राम घोष केला जात आहे. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल तसेच अन्य अनेक मान्यवर तेथे उपस्थित आहेत.प्रख्यात काळाराम मंदिरात सार्वजनिक दर्शनाला बंदी असली तरी गाभाऱ्यात मंदिराच्या पुजाऱ्यांकडून पुजाविधी केला जात आहे. मंदिराच्या पूर्व दरवाजा वर माजी पालकमंत्री गिरीश महाजन पंचवटीचे आमदार अ‍ॅड राहुल ढिकले आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकRam Mandirराम मंदिरTapovanतपोवनAyodhyaअयोध्या