नाशिक : लायन्स क्लब आॅफ नाशिक कार्पोरेटचा पदग्रहण समारंभ माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष एमजेएफ डॉ. राजू मनवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच येथे संपन्न झाला. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र किसन वानखेडे, सचिव जयोम व्यास व खजिनदार डी. एस. पिंगळे यांनी पदभार स्वीकारला. माजी जिल्हा प्रशासक एमजेएफ विनोद कपूर यांच्याकडून नवीन कार्यकारिणीने शपथ घेतली. यावेळी सचिव जोयोम व्यास, खजिनदार डी. एस. पिंगळे, विनय बिरारी, एमजेएफ विलासराव पाटील, उद्धव अहिरे, सुनील निकुंभ, मंगेश शेंडे, लक्ष्मण लांडगे, रवींद्र दुसाने, विलास बिरारी, उदय कोठावदे, कैलास पवार, सतीश मालुंडे, राहुल शाह, संजीव रसाने, किरण चव्हाण, चार्टर्ड प्रेसिडेंट शेखर सोनवणे, विलासराव पाटील, सागर बोंडे, सुनील निकुंभ, मावळते अध्यक्ष के. डी. पाटील आदींसह क्लबचे सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे अशोका बिल्डकॉनचे अशोका कटारिया, नाशिक सायकलिस्ट अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे संस्थेच्या वतीने घरकाम करण्याऱ्या महिलांसाठी नियमित आरोग्य शिबिर, आदिवासी आणि झोपडपट्टी भागात सॅनेटर नॅपकीनचे वाटप, स्वयंम रोजगारासाठी शिलाई मशीनचे वाटप, स्तनाचा कर्करोग तपासणी केली जाणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष वानखेडे यांनी सांगितले. यावेळी मावळते अध्यक्ष के. डी. पाटील यांनी मागील वर्षी राबविण्यात आलेल्या सामाजिक कार्याचा अहवाल सदर केला.
लायन्स क्लब कार्पोरेटचे पदग्रहण उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:31 AM