लेखानगर येथे अकरा हजार लाडू वितरण
लेखानगर येथे शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त सकाळीच ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पूजा व महाआरती करून ३९१ किलोचे असे अकरा हजार लाडू तयार करून परिसरात वितरण करण्यात आले. कैलास चुंभळे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी आमदार सीमा हिरे, नाना महाले, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार वसंत गिते , महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर,शिवाजी चुंभळे, दीपक बडगुजर, ऋतुराज पांडे, नगरसेविका कल्पना चुंभळे ,कल्पना पांडे, गोविंद घुगे ,सचिन मराठे,सिडकोचे प्रशासक घनशाम ठाकूर,बाळा दराडे,केशव पोरजे, प्रवीण तिदमे,राजेंद्र महाले, राधेय मालपाणी, दत्ता पाटील,श्याम साबळे , सभापती चंद्रकांत खोडे , रवींद्र पाटील, विलास चुंभळे उपस्थित होते.
सकल मराठा समाज
सालाबादप्रमाणे यंदाही येथील सकल मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती उत्सव सोहळा संपन्न झाला. सकल मराठा समाजाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री १२ वाजता महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कार्यकारिणीतर्फे करण्यात आली. सकाळी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना महाले, शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर,रवींद्र पगार, अण्णा पाटील, दत्ता पाटील, भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेवक गजानन शेलार, अशोक मुर्तडक, नीलेश ठाकरे, पुरुषोत्तम कडलग, मनीषा पवार, जगन पाटील , बाळासाहेब पाटील , करण गायकर, छबू नागरे , डॉ. सुभाष देवरे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.जयंती अध्यक्ष शैलेश साळुंखे, महिला अध्यक्ष रश्मी हिरे, मुरली भामरे ,धनाजी लगड, रवी पाटील, आशिष हिरे , विजय पाटील,संजय भामरे , गणेश अरिंगळे, बाळासाहेब गिते, मकरंद सोमवंशी ,योगेश गांगुर्डे ,मुकेश शेवाळे ,राम पाटील, प्रीतम भामरे ,अमोल पाटील ,दिनेश मोडक ,पंकज पाटील, शुभम महाले ,करण आरोटे उपस्थित होते. शिवछत्रपती उद्यानाची साफसफाई राजे शिव छत्रपती उद्यानाची मागील वर्षी शिवजयंतीच्या दिवशी या उद्यानाचे नामकरण करण्यात आले होते.आज शिवजयंतीच्या निमित्ताने शिवछत्रपती सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणची साफसफाई करण्यात आली.स्वछता मोहीम विशाल डोके यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. याप्रसंगी संजय भामरे, गोविंद घुगे, अमोल सोनवणे,अजय आव्हाड, व शिवछत्रपती सामजिक संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(फोटो -२० सिडको१)