नाशिकरोड : नाशिकरोडरेल्वेस्थानकातीलरेल्वे तिकीट आरक्षण कार्यालयामागील प्लॅटफॉर्म एकवर जाणारा रस्ता बंद केल्याने प्रवाशांची व कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय याबाबत ‘लोकमत’मध्ये दोन दिवसांपूर्वी सचित्र वृत्त प्रसिद्ध झाले होते. लोकमत वृत्ताची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने बंद केलेला रस्ता पुन्हा सुरू केल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.नाशिकरोड रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालयामागून रेल्वेस्थानकांत जाण्या-येण्यासाठी कुंभमेळ्यामध्ये नवीन रस्ता तयार करण्यात आला होता. यामुळे प्रवाशांची चांगली सोय झाली होती. मात्र दोन महिन्यांपूर्वी रेल्वेच्या भुसावळ विभागाचे प्रबंधक आर.के. यादव यांनी पाहणी करताना सुरक्षितेचे कारण देत तो नवीन रस्ता बंद करण्याचे आदेश दिले होते. रेल्वे प्रशासनाने तत्काळ त्या रस्त्याचे प्रवेशद्वार कुलूप लावून बंद केले होते. यामुळे प्लॅटफॉर्म एकवरील व पादचारी पुलावरून येणाºया प्रवाशांना सामानासह पायपीट करत मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडावे लागत होते. तर रेल्वेस्थानकात येणाºया प्रवाशांना फेरफटका मारून यावे लागत होते. त्या रस्त्याशेजारील पार्सलच्या कार्यालयातून बहुतांश प्रवासी ये-जा करत असल्याने तेथील कामगारांना काम करताना मोठी अडचण झाली होती.प्रवाशांची व कामगारांची गैरसोय लक्षात घेऊन याबाबत ‘लोकमत’मध्ये (१० जानेवारी) सचित्र सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. भुसावळ विभागाच्या प्रबंधकाच्या आदेशाबाबत प्रवाशांमध्ये व्यक्त होत असलेले आश्चर्य व सर्वांची होत असलेली गैरसोय लोकमतमध्ये मांडण्यात आली होती. या वृत्ताची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी बंद केलेल्या रस्त्याच्या प्रवेशद्वाराच्या फाटकाचे कुलूप उघडून प्रवाशांसाठी पुन्हा येण्या-जाण्यासाठी रस्ता सुरू करून दिला. यामुळे प्रवासी व कामगारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
रेल्वेस्थानकाचे प्रवेशद्वार पुन्हा खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 1:18 AM
नाशिकरोड रेल्वेस्थानकातील रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालयामागील प्लॅटफॉर्म एकवर जाणारा रस्ता बंद केल्याने प्रवाशांची व कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय याबाबत ‘लोकमत’मध्ये दोन दिवसांपूर्वी सचित्र वृत्त प्रसिद्ध झाले होते. लोकमत वृत्ताची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने बंद केलेला रस्ता पुन्हा सुरू केल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
ठळक मुद्देप्रवाशांची गैरसोय दूर झाल्याने समाधान