शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

उद्योजकाला साठ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 11:36 PM

अंबड औद्योगिक वसाहतीत भूखंड विकत घेऊन देतो, असे सांगत उद्योजकाची साठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मंत्रालयात दलाली करणाऱ्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीत भूखंड विकत घेऊन देतो, असे सांगत उद्योजकाची साठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मंत्रालयात दलाली करणाऱ्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले, खुटवडनगर भागातील उद्योजक राजेंद्र बोरसे यांचे अंबड औद्योगिक वसाहतीत युनिट आहे. कामकाज करताना या जागेत अडचणी येत असल्याने बोरसे यांनी याच भागात भूखंड विकत घेण्याची तयारी केली. एमआयडीसीत भूखंड विकत घेण्यासाठी माहिती घेत असताना बोरसे यांची मंत्रालयात दलालीचे काम करणाºया रमेश कुलकर्णी (अहमदनगर) यांच्याशी ओळख झाली. संशयित कुलकर्णी यांनी काही लोकांकडून पैसे घेत कामे केल्याने बोरसे यांनीदेखील त्यांच्यावर विश्वास ठेवला.यानंतर संशयित कुलकर्णी यांना एमआयडीसी परिसरात दोन हजार चौरस मीटरचा प्लॉट असल्याचे बोरसे यांना सांगितले. यासाठी बोरसे यांनी टप्प्याटप्प्याने कुलकर्णी यास सप्टेंबर २०१७ ते मे २०१९ या दरम्यान तीन वर्षांत रोख रक्कम तसेच आरटीजीएसच्या माध्यमातून सुमारे साठ लाख रुपये दिले. तीन वर्ष होऊनही भूखंड मिळत नसल्याने बोरसे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर शनिवारी (दि.१) उद्योजक राजेंद्र बोरसे यांनी रमेश कुलकर्णी यांच्या विरोधात फसवणुकीचा तक्रार दिली आहे.‘पेटीएम’द्वारे ३७ हजारांची फसवणूकइंदिरानगर परिसरातील एका रहिवाशाने ओएलएक्सवर विक्रीसाठी ब्रेसलेट ठेवले होते. एका भामट्याने मोबाइलवरून ब्रेसलेट खरेदीचा बहाणा करत ग्राहक असल्याचे भासवून फोन पे व पेटीएम या अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर करत ३७ हजार ९४८ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भामट्याने बनावट ग्राहक बनून दोन मोबाइल क्रमांकावरून फिर्यादी हेमंत उमाकांत उदावंत (४६, रा. श्रीजी संकुल) यांनी ओएलएक्स या वेबसाईटवर एक ब्रेसलेट विक्रीसाठी अपलोड केले होते. या ब्रेसलेटची खरेदी करण्याचे कारण दाखवून उदावंत यांच्याशी संपर्क साधत फोन-पे, पेटीएमच्या माध्यमातून ३७ हजार ९४८ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी