गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना दहा दिवसांपासून रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते. अखेरीस आज दुपारी दोन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर सायंकाळी नाशिक अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. चांडक यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र उद्योजक अतुल चांडक, सून शिवमाला, मुलगा रचना भुतडा तसेच नातू गौरव असा परिवार आहे.
मूळचे सिन्नर तालुक्यातील रहिवासी असलेले चांडक हे कॉकब्रँड सिन्नर बिडीजचे संचालकदेखील होते. वडिलांच्या व्यापाराला त्यांनी गती दिली. व्यापाराच्या निमित्ताने देश-विदेशात प्रवास केल्यानंतर नाशिक शहरात चांगले हॉटेल असावे यासाठी त्यांनी १९८३ मध्ये वकील वाडीत हॉटेल पंचवटी सुरू केले. सुरुवातीला एका हॉटेलपर्यंत मर्यादित असलेल्या या हॉटेलचा पंचवटी ग्रुप हॉटेल असा विस्तार झाला. संगमनेर, पुणे, मुंबई तसेच राज्याबाहेर गुडगाव आणि जबलपूर येथेही शाखा झाल्या. हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थापन झालेल्या नाशिक हॉटेल असोसिएशनचे ते संस्थापक होते तसेच त्यांनी या संस्थेचे अध्यक्षपदही भूषवले. अर्पण रक्तपेढीचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम बघितले. संस्कृती वैभव या संस्थेचे ते कार्याध्यक्ष होते. सार्वजनिक वाचनालय या संस्थांशी ते संबंधित होते. अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांना त्यांनी देणगी देऊन आर्थिक पाठबळ दिले होते. सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या राधाकिसन चांडक यांनी महेश सेवा निधी या संस्थेचे अध्यक्ष असताना त्यांनी विधवा महिलांना पेन्शन लागू करण्याचे मोलाचे कामही केले.
छायाचित्र आर फोटोवर १३ राधाकिसन चांडक
===Photopath===
130521\13nsk_31_13052021_13.jpg
===Caption===
राधाकिसन चांडक